अहमदपूरमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 21:33 IST2025-01-11T21:33:42+5:302025-01-11T21:33:59+5:30
नांदेड जिह्यातील हडोळी बु. (ता. कंधार) येथील पती-पत्नी अहमदपूर येथे शनिवारी काही खासगी कामानिमित्त आले हाेते.

अहमदपूरमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी
राजकुमार जाेंधळे
लातूर - भरधाव कार आणि दुचाकीची समाेरा-समाेर जाेराची धडक झाल्याची घटना अहमदपूर शहरानजीक थाेडगा राेडवरील रिंगराेडवर शनिवारी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर लातुरला पाठविण्यात आले आहे.
नांदेड जिह्यातील हडोळी बु. (ता. कंधार) येथील पती-पत्नी अहमदपूर येथे शनिवारी काही खासगी कामानिमित्त आले हाेते. दरम्यान, काम आटाेपल्यानंतर दुचाकीवरुन गावाकडे जात हाेते. अहमदपूर शहरानजीक असलेल्या थोडगा रोडवरील राष्ट्रीय महामार्गाच्या रिंगराेडवर दुचाकी (एम.एच २६ बी.यू. ५९ ५२) आली असता, लातूरकडून नांदेडकडे भरधाव जाणारी कारची (एम.एच. २६ सी.सी. ८१००) समोरा-समोर जोराची धकड झाली. हा अपघाता शनिवारी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास घडला. या भीषण अपघातात दुचाकीवरील सुखाचार्य नारायण गुट्टे (वय ५९ रा. हडोळी ता. कंधार जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी दिनाबाई सुखाचार्य गुट्टे (वय ५७) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहीती देण्यात आली.
अपघातात वाहनांचा झाला पूर्णत: चेंदामेंदा
अहमदपूरकडून नांदेडकडे जाणाऱ्या दुचाकीचा आणि लातूरकडून नाेंदडकच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारचा समाेराेसमाेर अपघात झाल्याची घटना रिंगराेडवर घडली. हा अपघात एवढा भीषण हाेत की, दुचाकीस्वार जागीच ठार झाला. यामध्ये दुचाकीसह कारचा पार चेंदामेंदा झाला आहे.