मसालेदार पदार्थामुळे हाेऊ शकताे पाेटाचा अल्सर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:45+5:302021-09-05T04:24:45+5:30
काय काळजी घेणार... १ चटपटीत, तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्याचा अनेकांना माेह आवरता येत नाही. ताे आता आवारला ...
काय काळजी घेणार...
१ चटपटीत, तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्याचा अनेकांना माेह आवरता येत नाही. ताे आता आवारला पाहिजे. अशा पदार्थ्याच्या अति खाण्याने आराेग्य गंभीर प्रश्न निर्माण हाेतात.
२ निकृष्ट दर्जाच्या तेला तळलेले पदार्थ बाहेर मिळतात. या पदार्थांची गुणवत्ता काय, याबाबतही विचार केला पाहिजे. अशा मसालेदार आणि तेलकट पदार्थांना टाळले पाहिजे. धावपळीच्या आयुष्यात असले पदार्थ खाणे टाळले पाहिजेत.
३ आराेग्याचा विचार केला तर तिखट, मसालेदार, तेलकट आणि चटपटीत पदार्थ खाणे अंगलट येणारे आहे. यातून पाेटाचे आजार वाढण्याची भीती डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. यासाठी दरदिन व्यायाम, याेगा आणि पायी फिरण्यावर भर दिला पाहिजे.
सकस आणि संतुलित आहार घ्यावा...
सतत उपाशी राहणे हे धाेकादायक आहे. अचानक भूक लागली म्हणून बाहेर गाड्यावर मिळणारे पदार्थ खाणे हेही आराेग्याच्या दृष्टिने अयाेग्य आहे. सकस आणि संतुलित आहर घेणे गरजेचे आहे.
- डाॅ. विश्रांत भारती
सतत मसालेदार, तळलेले आणि तिखट पदार्थ खाण्यावर भर दिला तर ते आराेग्यासाठी घातक आहे. यातून पाेटाचे विकार हाेण्याची शक्यता अधिक आहे. पाेटाचा घेर वाढणे, अल्सर हाेणे, सतत पाेट दुखण्याचे प्रकार वाढतात. यासाठी सकस आहार घ्यावा.
- डाॅ. ओमप्रकाश कदम