रेणापुरातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:14 AM2021-07-05T04:14:16+5:302021-07-05T04:14:16+5:30

शिबिराचे उद्घाटन रेणापूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ...

Spontaneous response to blood donation camp in Renapur | रेणापुरातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रेणापुरातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

शिबिराचे उद्घाटन रेणापूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाणे, प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख राजाभाऊ राठोड, शिक्षण फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन बोळंगे, उपाध्यक्ष कोंडिराम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत वार्ताहर बालाजी कटके यांनी केले. शिबिरात ३० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व रेणापूर तालुका प्रहार संघटनेच्या वतीने प्रमाणपत्र एक रोप देण्यात आले. शिबिरासाठी प्रहार संघटना, शिवसेना, शिक्षण फाउंडेशन यांनी सहकार्य केले.

कॅप्शन : स्वातंत्र्य सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत रक्ताचं नातं या मोहिमेअंतर्गत रेणापूर येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी गोविंद पाटील, सचिन दाणे, राजाभाऊ राठोड, गजानन बोळंगे, कोंडिराम काळे.

लोकमत रक्तदान मोहिमेतील आजचे रक्तदाते...

बी पॉझिटिव्ह रक्तगटाचे श्रीमंत प्रभाकर माने, नानासाहेब केरबा माने, नवनाथ सुभाष पेंडपाले, अमोल मधुकर गोडभरले, यशवंत शिवाजी पवार, मेघराज भारत साळुंके, शुभम दत्तात्रय लोखंडे, अनिल मधुकर गोडभरले, सरफोद्दीन मैनोद्दीन शेख, भरत लक्ष्मण मोटे, उमाकांत धोंडिराम शिंदे, अजय काकासाहेब घोडके, ओ पॉझिटिव्ह रक्तगटाचे श्रीराम हणमंत शिंदे, दिगांबर पांडुरंग शिंदे, रोहन विजयकुमार दौंड, राजकुमार उत्तमराव नागरगोजे, नाथश्री दत्तात्रय माने, प्रवीण शिवाजी भावे, आकाश महादेव घोडके, विशाल उत्तमराव इगे, ए पॉझिटिव्ह रक्तगटाचे एकनाथ जगन्नाथ काळे, राजाभाऊ ग्यानदेव राठोड, भगवान पंडित शिंदे, विपुल विजयकुमार चेपट, सचिन गणपतराव डोणे, प्रमोद राजेंद्र डोणे, किरण विजयकुमार चेपट, बालाजी गंगाधर कटके, एबी पॉझिटिव्ह रक्तगटाचे विकास श्रीहरी तपघाले, एबी निगेटिव्ह रक्तगटाचे मुज्जमिल अजमोद्दीन शेख.

Web Title: Spontaneous response to blood donation camp in Renapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.