SSC Result : लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९९.९६ टक्के; ६१ हजार २८८ विद्यार्थी प्राविण्यासह झाले उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 03:43 PM2021-07-16T15:43:14+5:302021-07-16T15:44:44+5:30
SSC Result Latur Division Board : दहावीच्या निकालासाठी शाळास्तरावर शासन निर्णयानुसार निकाल समितीचे गठण करुन त्यांना विषय व वर्ग शिक्षक यांनी केलेल्या मुल्यमापनावर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला.
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला असून, त्यामध्ये लातूर विभागीय मंडळाचा ९९.९६ टक्के निकाल लागला आहे. मुल्यमापन केलेल्या १ लाख १० हजार ३४२ विद्यार्थ्यांपैकी ६१ हजार २८८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी- १ मध्ये ३९ हजार ६३७, श्रेणी -२ मध्ये ४ हजार ७३०, पास श्रेणीत ४ हजार १८६ असे एकूण १ लाख ९ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ( Latur Divisional Board's Overall SSC result 99.96 percent )
दहावीच्या निकालासाठी शाळास्तरावर शासन निर्णयानुसार निकाल समितीचे गठण करुन त्यांना विषय व वर्ग शिक्षक यांनी केलेल्या मुल्यमापनावर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. लातूर जिल्ह्यात दहावीसाठी ४० हजार २८१ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी ४० हजार २७७ विद्यार्थ्यांचे मुल्यमापन झाले. या मुल्यमापनात २२ हजार ८०६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर श्रेणी -१ मध्ये १४ हजार १९१, श्रेणी -२ मध्ये २ हजार ७, पास श्रेणामध्ये १ हजार ११८ असे एकूण ४० हजार १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६१ टक्के आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातून २२ हजार ७३३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २२ हजार ७३२ विद्यार्थ्यांचे मुल्यांकन झाले. या मुल्यांकनात १२ हजार ४४० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. श्रेणी - १ मध्ये ८ हजार ५७, श्रेणी -२ मध्ये १ हजार ३२४ तर पास श्रेणीत ७८० असे एकूण २२ हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.४२ टक्के आहे.
नांदेड जिल्ह्यात ४७ हजार ३३८ विद्यार्थ्यांची नोंदणी मुल्यांकणासाठी झाली होती. प्रत्यक्ष मुल्यांकन ४७ हजार ३३३ विद्यार्थ्यांचे झाले. या मुल्यांकनात २६ हजार ४२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. श्रेणी -१ मध्ये १७ हजार ३८९, श्रेणी -२ मध्ये १ हजार ३९९ आणि पास श्रेणात २ हजार २८८ असे एकूण ४७ हजार ११८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. नांदेड जिल्ह्याच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.५४ टक्के आहे.