एस.टी.चे प्रवासी घटले; अध्यक्ष चिंतित

By Admin | Published: May 21, 2014 12:03 AM2014-05-21T00:03:37+5:302014-05-21T00:15:00+5:30

लातूर : एसटी महामंडाळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सोमवारी अचानक लातूरला धावती भेट दिली़ या भेटीत त्यांनी लातूर विभागाचा आढावा घेतला़

ST migrations declined; President worried | एस.टी.चे प्रवासी घटले; अध्यक्ष चिंतित

एस.टी.चे प्रवासी घटले; अध्यक्ष चिंतित

googlenewsNext

लातूर : एसटी महामंडाळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सोमवारी अचानक लातूरला धावती भेट दिली़ या भेटीत त्यांनी लातूर विभागाचा आढावा घेतला़ यावेळी लातूरच नव्हे तर राज्यभरात घटलेल्या प्रवासी संख्येबद्दल चिंता व्यक्त केली़ प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळविण्यासाठी काय उपायोजना करता येतील, यावर अधिकार्‍यांसोबत चर्चाही केली़ राज्यभरातील एसटीकडे प्रवाशांनी सध्या पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे़ नजिकच्या काळात प्रवासी भारमान २ टक्याने घटले आहे़ त्यास लातूर विभागही अपवाद ठरला नाही़ सोमवारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी अचानक लातूरला धावती भेट दिली़ या भेटीत त्यांनी लातूर विभागातील एसटीच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन आढावा घेतला़ या बैठकीत त्यांनी लातुरातील प्रवासी भारमानाची माहिती आवर्जून घेतली़ अधिकार्‍यांकडे प्रवासी का घटले, याविषयी विचारणा करुन त्यावर काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा केली़ यावर अधिकार्‍यांनी लातूर विभागात जुन्या बसेसची संख्या अधिक असल्याची कैफियत मांडली़ जुन्या व खिळखिळ्या झालेल्या बसेसमुळे ग्रामीण ीागातील प्रवासी खाजगी वाहनांकडे धावत आहेत़ तर लांब पल्लयाच्या बसेसही अद्ययावत नाहीत़ जुन्या बसेसवरच त्यांचा भार असल्याने प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सला पसंती देत असल्याचे अधिकार्‍यांनी जीवनराव गोरे यांच्या निदर्शनास आणून दिले़ तसेच नवीन बसेस देण्याची मागणीही गोरे यांच्याकडे करण्यात आली़ वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर गोरे यांनी तातडीने लातूर विभागाला १० नवीन बसेस देण्याच्या सूचना त्यांच्यासमवेत असलेल्या प्रादेशिक अभियंत्यांना केली़ (प्रतिनिधी) दरम्यान, बसस्थानक व आगारात पडलेल्या खड्डयांची माहिती घेऊन त्यांनी तातडीने हे खड्डे बुजविण्याची सूचना केली़ तात्पुरती डागडुजी न करता पक्के काम करण्याच्या सूचना केल्या़ शिवाय, स्वच्छता राखण्याबाबतही त्यांनी अधिकार्‍यांना सांगितले़ लग्नसराईत केलेल्या प्रयत्नांची माहिती घेऊन उत्पन्न व खर्चाचा आढावाही यावेळी घेतला़

Web Title: ST migrations declined; President worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.