लातूर आगाराची एसटी सुपरफास्ट; तीन महिन्यांत तीन कोटींचा फायदा!

By हणमंत गायकवाड | Published: August 16, 2023 08:11 PM2023-08-16T20:11:31+5:302023-08-16T20:11:47+5:30

योजनामुळे प्रवासी एसटीकडे वळले; १५ कोटी ७२ लाख ७ हजार ३३६ रुपयांचा व्यवसाय

ST Superfast from Latur Agar; Profit of three crores in three months! | लातूर आगाराची एसटी सुपरफास्ट; तीन महिन्यांत तीन कोटींचा फायदा!

लातूर आगाराची एसटी सुपरफास्ट; तीन महिन्यांत तीन कोटींचा फायदा!

googlenewsNext

लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आता सुपरफास्ट झाली असून, तोट्यातून फायद्यात प्रवासी सेवा सुरू आहे. गेल्या तीन महिन्यात १५ कोटी ७२ लाख ७ हजार ३३६ रुपयांचा एकट्या लातूर आगाराचा व्यवसाय झाला आहे. तर तीन कोटी एक लाख २६ हजार रुपयांचा निव्वळ फायदा झाला आहे.

ज्यादा प्रवासी वाहतूक तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजना यासह अनेक योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे एसटीला फायदा होत आहे. गेल्या तीन महिन्यांत लातूर आगाराने १५ कोटी ७२ लाख ७३३६ रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यातून तीन कोटी एक लाख २६ हजार रुपयांचा फायदा लातूर आगाराला झाला आहे. जिल्ह्यातील अन्य आगारांनी चांगला व्यवसाय करून फायदा मिळवला आहे.

तीन महिन्यात लातूर आगाराची तिजोरी भरली...
१) लातूर आगाराच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मे महिन्यात पाच कोटी ९० लाख ७४ हजार ८५४ रुपयांचा व्यवसाय झाला. त्यातून १ कोटी ६९ लाख रुपयांचा फायदा एसटीला झाला आहे. या महिन्यात १५ लाख ९३ हजार किलोमीटर एसटी धावली आहे.
२) जून महिन्यात पाच कोटी सात लाख ६९ हजार ३४० रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यात ७५ लाखांचा फायदा एसटीला झाला आहे. १४ लाख ८३ हजार किलोमीटर एसटी या महिन्यात धावली आहे.
३) जुलै महिन्यामध्ये १४ लाख ८५ हजार किलोमीटर लातूर आगाराची बस धावलेली आहेः त्यात चार कोटी ७४ लाख २७ हजार १४२ लाख रुपयांचा व्यवसाय या महिन्यात लातूर आगाराचा झाला. एकंदर अनेक योजना आणि ज्यादा प्रवासी वाहतुकीमुळे एसटी तोट्यातून फायद्यात आली आहे.

योजनामुळे प्रवासी एसटीकडे वळले
ज्यादा प्रवासी वाहतूक महिला सन्मान योजना ज्येष्ठ नागरिक अमृत योजना यासारख्या अन्य योजनामुळे प्रवासी एसटीकडे वळला आहे. त्यामुळे चांगला व्यवसाय होत आहे. गेल्या तीन महिन्यांत लातूर आगाराला तीन कोटी एक लाख २६ हजारांचा फायदा झाला आहे.
- हनुमंत चपटे, बसस्थानकप्रमुख लातूर

Web Title: ST Superfast from Latur Agar; Profit of three crores in three months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.