घराच्या वाटणीवरून वडिलांवरच चाकूहल्ला; मुलाविराेधात गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Updated: July 18, 2023 23:30 IST2023-07-18T23:28:27+5:302023-07-18T23:30:05+5:30
उदगीरातील घटना...

घराच्या वाटणीवरून वडिलांवरच चाकूहल्ला; मुलाविराेधात गुन्हा
राजकुमार जाेंधळे, लातूर : घराच्या वाटणीच्या कारणावरून मुलाने वडिलाच्या छातीवर, हातावर चाकू हल्ला केल्याची घटना उदगीर शहरातील विकास नगरात घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात मुलाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी गाेविंद नारायण दापके (वय ६८ रा. विकास नगर, उदगीर) यांना उदगीर शहरातच राहणारा मुलगा विरेंद्र गाेविंद दापके याने घराच्या वाटणीच्या कारणावरून शिवीगाळ केली. शिवाय, लाेखंडी चाकूने छातीवर आणि हातावर मारहाण करत त्यांना जखमी केले. वाटणी नाही दिली तर जीवे मारू, अशी धमकी दिली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात जखमी वडिलांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक फाैजदार कांबळे करत आहेत.