राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा एल्गार

By हणमंत गायकवाड | Published: September 21, 2022 05:03 PM2022-09-21T17:03:36+5:302022-09-21T17:04:13+5:30

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

State Government Employees Central Association protest to apply old pension plan | राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा एल्गार

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा एल्गार

googlenewsNext

लातूर: राजस्थान,पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा आणि छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना सर्वांनाच लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह विविध संघटनांनी बुधवारी शहरात भव्य मोटर सायकल रॅली काढली. या रॅलीला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नोव्हेंबर २००५ नंतर सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह विविध संघटनांनी मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला लातूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला.

रॅलीचा समारोप अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांना निवेदन दिल्यानंतर झाला. मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष बी.बी. गायकवाड, सरचिटणीस संजय कलशेट्टी, कोषाध्यक्ष गोविंद लाडकर, उपाध्यक्ष आर. एस.तांदळे,संपर्कप्रमुख दीपक येवते, महसूल संघटनेचे अध्यक्ष माधव पांचाळ, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अनंत सूर्यवंशी, तलाठी संघटनेचे अध्यक्ष महेश हिपरगे, माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक माळगे, सचिव दिलीप वाठोळे, पोलीस कार्यालयीन संघटनेचे अध्यक्ष सुदेश परदेशी, भूमी अभिलेख संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष प्रल्हाद लखनगिरे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सचिव सचिन चव्हाण, तानाजी सोमवंशी, अरविंद पुलगूर्ले, संतोष क्षीरसागर, नीलरत्न बनसोडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जुनी पेन्शन योजना लागू करणे व अन्य प्रलंबित मागण्यासाठी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात जुने प्रशासकीय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली आली. त्यानंतर या रॅलीचा समारोप अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर करण्यात आला. यावेळी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष बी.बी. गायकवाड, संजय कलशेट्टी,दीपक येवते, माधव पांचाळ,महेश हिप्परगे, सोनाली पाटील, अनंत सोमवंशी, तानाजी सावंत, सचिन चव्हाण आदिनी मार्गदर्शन केले.

Web Title: State Government Employees Central Association protest to apply old pension plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.