महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटवू नये; वलांडी येथे रास्तारोको आंदोलन
By हरी मोकाशे | Published: April 21, 2023 04:11 PM2023-04-21T16:11:50+5:302023-04-21T16:12:03+5:30
कव्हा नाका परिसरातील महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा हटविण्यात येऊ नये यासाठी आंदोलन
वलांडी : लातुरातील कव्हा नाका परिसरातील महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा हटविण्यात येऊ नये. महामार्ग शहराच्या बाहेरून नेण्यात यावा. पुतळ्याच्या दोन्ही बाजूस रस्ता रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध करून पुतळा परिसराचे सुशोभीकरण करावे, आदी प्रमुख मागण्यांसाठी महात्मा बसवेश्वर पुतळा बचाव कृती समिती देवणीच्या वतीने शुक्रवारी वलांडी (ता. देवणी) येथे सकाळी १०.३० वा. च्या सुमारास तासभर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे यांना देण्यात आले.
आंदोलनात वलांडी व्यापारी कमिटीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे, देवणी तालुका काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडियाचे प्रमुख माधव बेंजर्गे, विशाल फुलारी, महादेव कोठे, अंकिता सोमनाथ बिरादार यांनी मनोगत व्यक्त करून पुतळा हटविण्यात येऊ नये अशी मागणी केली. यावेळी वलांडीसह परिसरातील सुरेंद्र अंबुलगे, माजी सरपंच विजयकुमार मुके, अरुण पाटील, महेश पाटील, ब्रह्मानंद स्वामी, रवी स्वामी, प्रशांत बिरादार, उमाकांत बनाळे, सिद्धेश्वर बनाळे, अमित घुगे, विशाल बिरादार, अनिकेत कासनाळे, शंकर घुगे, जीवन बिरादार, सचिन बरगाले, ईश्वर बदनाळे, दिनकर बिरादार, सोमनाथ बिरादार, सोमनाथ उमाटे, शिवदास उमाटे, बाळासाहेब रोडगे, कार्तिक झुंगास्वामी, गणेश चव्हाळे, महेंद्र अंबुलगे, प्रकाश बिरादार, प्रशांत महाजन यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती. आंदोलनादरम्यान पोलिस उपनिरीक्षक नारायण डफलवाड, पोलिस नाईक किवंडे, शेटकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.