घरणी प्रकल्पाचे पाणी लातूरला नको; शिरुर अनंतपाळ येथे ग्रामस्थांचे पिंडदान आंदोलन

By संदीप शिंदे | Published: July 8, 2023 05:53 PM2023-07-08T17:53:53+5:302023-07-08T17:54:06+5:30

शेतकऱ्यांना अंधारात ठेवून घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूर परिसरातील महाराणा प्रतापनगरला घेऊन जाण्यासाठी जलवाहिनी योजना मंजुर करण्यात आली आहे.

stop Gharni project water to Latur; Pind dan movement of villagers at Shirur Anantapal | घरणी प्रकल्पाचे पाणी लातूरला नको; शिरुर अनंतपाळ येथे ग्रामस्थांचे पिंडदान आंदोलन

घरणी प्रकल्पाचे पाणी लातूरला नको; शिरुर अनंतपाळ येथे ग्रामस्थांचे पिंडदान आंदोलन

googlenewsNext

शिरुर अनंतपाळ : घरणी मध्यम प्रकल्पाचे लातूरच्या महाराणा प्रतापनगरला घेऊन जाण्यासाठी जलवाहिनीचे खोदकाम करण्यात येत आहे. त्यास विरोध करण्यासाठी मागील १३ दिवसांपासून विविध पध्दतीने आंदोलन करण्यात येत असून, शनिवारी शिरुर अनंतपाळ येथे पिंडदान आंदोलन करण्यात आले.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्पावरून ७० गावाना पाणी पुरवठा योजनेसह शेतीला सिंचन योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु शेतकऱ्यांना अंधारात ठेवून घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूर परिसरातील महाराणा प्रतापनगरला घेऊन जाण्यासाठी जलवाहिनी योजना मंजुर करण्यात आली आहे. त्याचे काम सध्या सुरु असून, विरोध दर्शविण्यासाठी शेतकरी, सर्वपक्षीय नेते एकवटले असुन, १३ दिवसापासून येथील पोलीस चौकीसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

रास्ता रोको, मोर्चा, अन्नत्याग, शोले स्टाईल आंदोलन, जागर आंदोलन अशा विविध पध्दतीने आंदोलन करण्यात आले असून, शनिवारी पिंडदान आंदोलन करण्यात आले. यावेळी धोंडीराम सांगवे, शिवाजी पेठे, अनिल देवंगरे, संतोष शेटे, गणेश धुमाळे, रामकिशन गड्डीमे, सुमतीनंदन दुरुगकर, महादेव आवाळे, सुचित लासुणे, विशाल गायकवाड, विरभद्र मुदाळे, विनोद देवंगरे, सोमेश्वर तोंडारे, अशोक कोरे, ओमकार बिराजदार, बालाजी सलगरे, तानाजी फुलारी, नरसिंग कामगुंडा, नवाज चौधरी, महेश उंबरगे उपस्थित होते.

Web Title: stop Gharni project water to Latur; Pind dan movement of villagers at Shirur Anantapal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.