राष्ट्रीय समाज पक्षाचा लातुरात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:14 AM2021-07-05T04:14:13+5:302021-07-05T04:14:13+5:30

दिलेल्या मुदतीत राज्य सरकारने माहिती न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली. परिणामी, समाजाचा हक्क हिरावला ...

Stop the Rastriya Samaj Party in Latur | राष्ट्रीय समाज पक्षाचा लातुरात रास्ता रोको

राष्ट्रीय समाज पक्षाचा लातुरात रास्ता रोको

Next

दिलेल्या मुदतीत राज्य सरकारने माहिती न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली. परिणामी, समाजाचा हक्क हिरावला जाणार आहे. राज्य सरकारने इंपिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर सादर करावा, आरक्षणासंदर्भात निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, इतर मागासवर्ग आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबींच्या पूर्ततेसाठी काम सुरू करावे या मागण्यांसाठी रविवारी लातुरात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आंदाेलकांनी राज्य सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना अटक करून नंतर साेडून दिले.

आंदाेलनात जिल्हाध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, जिल्हा संपर्कप्रमुख रामराव रोडे, गोविंदराव नरवटे, दादासाहेब करपे, नागनाथ बोडके, धनाजी भंडारे, संतोष हाके, लहूकांत शेवाळे, भास्कर भंडारे, बालाजी लहुरे,अशोक शिंपले, बालाजी चिंचोळे, राम भंगे, बालाजी देवकते, जकी शेख, शिवाजी हजारे, बालाजी देवकते, शेषराव सूर्यवंशी, लातूर तालुकाध्यक्ष सुदाम पांचाळ, काशीनाथ जेटनवरे, बालाजी मल्लेशे, नवनाथ भुरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला हाेता.

Web Title: Stop the Rastriya Samaj Party in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.