तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; सामाजिक सलोख्याला प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 07:55 PM2018-09-14T19:55:56+5:302018-09-14T19:57:40+5:30
पोलीस अधीक्षक आर. राजा : सोशल पोलिसिंगवरही भर
विजय मुंडे
उस्मानाबाद : समाजात वावरणाऱ्या प्रत्येक घटकाने कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. अवैध धंदे चालविणाºयांसह समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाºया गावगुंडांवर यापुढे धडक कारवाई केली जाईल. शिवाय, ठाणेस्तरावर सर्वसामान्यांशी संवाद वाढवून शांतता प्रस्थापित करणार असल्याचे उस्मानाबादचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक आऱ राजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आर. राजा म्हणाले, गडचिरोली येथील कामकाज आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कामकाजात खूप मोठा फरक आहे़ उस्मानाबादचा पदभार हाती घेतल्यानंतर पोलिसिंगच्या दृष्टीने माहिती घेतली आहे़ यापुढील काळात वेळोवेळी ठाणेस्तरावर बैठका घेऊन सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहोत. 21 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात केवळ 1800 पोलीस कर्मचारी आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांनीही सत्याच्या मागे खंबिरपणे उभा राहून पोलिसांच्या प्रत्येक कामात आवश्यक ती मदत करणे गरजेचे आहे़ विविध कारणांवरून सतत भांडणे करून धार्मिक तेढ निर्माण करणाºयांवर आमचे विशेष लक्ष राहणार आहे़ यापूर्वीच्या घटनांमध्ये वेळोवेळी सहभाग असलेल्यांच्या याद्या तयार केल्या जात आहेत.
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजून घेत ते सोडविण्यावर आपला अधिक भर राहणार आहे. पोलीस ठाणे, वसाहती दुरूस्तीसाठीही आपण पाठपुरावा करणार आहोत. शहरी भागातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. तुळजापूर शहरातील ट्रॉफिकचा प्रश्न सोडविण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत़ विशेषत: यात्रा कालावधीत वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे़ सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही आर. राजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गुन्ह्यांच्या निपटाऱ्यासाठी मोहीम
ठाणेस्तरावर दाखल प्रलंबीत गुन्ह्यांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी वेळोवेळी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. गुन्ह्यांच्या तपासासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शाळा, महाविद्यालयांना भेटी
महिला, मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पथक कार्यरत असून, शाळेच्या वेळांमध्ये पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे़ लवकरच शाळा-महाविद्यालयात भेटी देऊन, विद्यार्थ्यांशी चर्चा केली जाणार आहे़ मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार आहेत.
सोशल मीडियावर विशेष लक्ष
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, फोटो टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवले आहे़ सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनीही कायद्याचे पालन करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक आ. राजा यांनी केले आहे.