लातूर पालिकेची कडक कारवाई; अनधिकृत जाहिरातींचे पोल स्टॅन्ड केले रोलर चालवून नष्ट

By हणमंत गायकवाड | Published: August 12, 2023 02:09 PM2023-08-12T14:09:43+5:302023-08-12T14:10:09+5:30

शहरातील औसा रोड, रेणापूर रोड, बार्शी रोड, विवेकानंद गांधी चौक अशा मुख्य चौकांमध्ये तसेच मुख्य रस्त्यालगत अनेक ठिकाणी जाहिरातीचे अनधिकृत स्टॅन्ड पोला आहेत.

Strict action by Latur Municipality; Unauthorized advertising pole stands destroyed by roller driving | लातूर पालिकेची कडक कारवाई; अनधिकृत जाहिरातींचे पोल स्टॅन्ड केले रोलर चालवून नष्ट

लातूर पालिकेची कडक कारवाई; अनधिकृत जाहिरातींचे पोल स्टॅन्ड केले रोलर चालवून नष्ट

googlenewsNext

लातूर: महानगरपालिकेच्या हद्दीत शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत जाहिरातीचे बॅनर,कट आउट आणि त्यासाठी लावण्यात आलेले स्टॅन्ड मोठ्या प्रमाणात आहेत. याविरुद्ध महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने शनिवारी मोहीम राबवली. या मोहिमेत ५० अनाधिकृत स्टॅन्ड पोल हटवून रोलरच्या साह्याने नष्ट करण्यात आले.

शहरातील औसा रोड, रेणापूर रोड, बार्शी रोड, विवेकानंद गांधी चौक अशा मुख्य चौकांमध्ये तसेच मुख्य रस्त्यालगत अनेक ठिकाणी जाहिरातीचे अनधिकृत स्टॅन्ड पोला आहेत. सदर अनधिकृत स्टॅन्ड पोल काढण्याची मोहीम अतिक्रमण विभागाने राबविली. त्यानुसार पोल हटविण्यात आले आहेत. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या सूचनेनुसार आणि उपायुक्त विना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख रवी कांबळे, मुस्तफा शेख,अजय घोडके, अतिश गायकवाड, महेंद्र घोडके, आबा कांबळे, रजाक शेख यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.

Web Title: Strict action by Latur Municipality; Unauthorized advertising pole stands destroyed by roller driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.