शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारणा
By हरी मोकाशे | Published: February 16, 2023 04:53 PM2023-02-16T16:53:28+5:302023-02-16T16:54:26+5:30
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने गुरुवारी पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व कामबंद आंदोलनात औराद शहाजानी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
लातूर - विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाने गुरुवारी पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व कामबंद आंदोलनात औराद शहाजानी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
जुनी पेन्शन, आश्वासित प्रगती योजना, शिक्षकेतर कर्मचारी भरती, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आंदोलनात कार्यालयीन अधीक्षक संजीवकुमार होसुरे, काशिनाथ फुलारी, मोईन आळंदकर, विलास बिरादार, विलास होटकर, नबी बागवान, मारोती पवार, व्यंकट शिवणे, विजयकुमार बाबछडे, रुपेश मोरे, राजेंद्र बेलुरे, गुरूनाथ राघो आदी शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. शासनाने मागण्यांबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा प्रभारी प्राचार्य डॉ. प्रदीप पाटील यांनी व्यक्त केली. या आंदोलनाला महाविद्यालयातील स्टाफ सेक्रेटरी डाॅ. जाफर चौधरी व प्राध्यापकांनी पाठिंबा दर्शविला.