वृक्षांचे नुकसान केल्याच्या निषेधार्थ कपडे काढून आंदाेलन

By राजकुमार जोंधळे | Published: December 6, 2022 06:27 PM2022-12-06T18:27:26+5:302022-12-06T18:29:05+5:30

ग्रीन लातूर वृक्ष टीमचा संताप, दररोज घेतली जातेय वृक्षांची अग्निपरीक्षा

Stripped of clothes to protest the destruction of trees | वृक्षांचे नुकसान केल्याच्या निषेधार्थ कपडे काढून आंदाेलन

वृक्षांचे नुकसान केल्याच्या निषेधार्थ कपडे काढून आंदाेलन

googlenewsNext

लातूर : येथील ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने गेल्या १ हजार २८५ दिवसांपासून अखंडित वृक्षलागवड, संवर्धनाचे काम सुरू आहे. या माध्यमातून लातूर शहरात माेठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. या लावलेल्या वृक्षांचे संवर्धनाचे कार्य नियमितपणे सुरू आहे. लातूर शहराचे हरित आच्छादन वाढले आहे, शहर हिरवेगार दिसत आहे. काही लोकांकडून सातत्याने झाडांची नासधूस सुरू आहे, झाडे तोडणे, झाडांखाली हेतुपूर्वक कचरा पेटवून देणे, विनाकारण झाडांच्या फांद्या तोडणे आणि हा प्रकार सातत्याने वाढत आहे.

दोन दिवसांपूर्वी विलासराव देशमुख मार्गावरील सात झाडांखाली मुद्दामहून कचरा पेटवून दिला, ज्यामुळे ती झाडे जळून जावीत. सात मोठी झाडे जळून गेली. काल उद्योग भवन परिसरात मोठ्या पिंपळाच्या वृक्षाखाली कचरा पेटवून देण्यात आला. यामुळे ते झाड जळाले आहे. वृक्षतोड, झाडांखाली कचरा जाळून झाडांना हानी पोहोचविणे या बाबी सतत महानगरपालिका आयुक्त, उपायुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. तर विभागीय आयुक्त औरंगाबाद येथे तक्रार करूनही संबंधिताकडून दखल घेतली जात नव्हती.

यामुळे ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी जाळलेल्या झाडासमोर कपडे काढून (अर्धनग्न) निषेध व्यक्त करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने लातूर शहरात वृक्ष समिती, वृक्ष प्राधिकरण स्थापन करावे, त्यांच्या बैठका घ्याव्यात, उद्यान कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, झाडे तोडणाऱ्या आणि झाडे जाळणाऱ्या संबंधित लोकांवर कारवाई करावी. अशी मागणी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, डॉ. भास्करराव बोरगावकर, पदमाकर बागल, सुलेखा कारेपूरकर, आकाश सावंत, मनीषा कोकणे, नागसेन कांबळे, अविनाश मंत्री, सीताराम कंजे आदींनी केली आहे.

Web Title: Stripped of clothes to protest the destruction of trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.