प्रत्येकास आरोग्य सेवा देण्यासाठी कसोशीने प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:22 AM2021-09-26T04:22:33+5:302021-09-26T04:22:33+5:30
जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, ...
जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, उदगीर पंचायत समिती सभापती शिवाजी मुळे, जि.प.चे समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेताब बेग, माजी सभापती मन्मथप्पा किडे, पंचायत समिती सभापती बालाजी ताकबिडे, उपसभापती सुनंदा धर्माधिकारी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारोती पांडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, अभियंता एस.एस. पाटील, शेख, पं.स. सदस्या आस्मा बिरादार, बाबूराव जाधव, उस्मान मोमीन, विठ्ठल चव्हाण, सत्यवान पांडे, सत्यवान पाटील, तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोनि. परमेश्वर कदम, रामराव राठोड, चंदन पाटील, हणमंतराव पाटील, संग्राम कांबळे, कार्यकारी अभियंता गंगथडे, उपविभागीय अभियंता संजय गर्जे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. आरोग्यमंत्री टोपे यांनी यासंदर्भातील प्रस्तावास तत्काळ मंजुरी देऊन निधी मंजूर केला. आता तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एक ग्रामीण रुग्णालय झाले आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचाराची सोय होणार आहे. घोणसी येथेही आरोग्य केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तालुक्यातील रस्ते, आरोग्य, स्वच्छता, वीज या मूलभूत प्रश्नांसाठी मी सातत्याने पाठपुरावा करून निधी आणला आहे.
यावेळी जि.प. अध्यक्ष केंद्रे यांचे समयोचित भाषण झाले. प्रास्ताविक सरपंच महेताब बेग, सूत्रसंचालन नूर पटेल यांनी केले. आभार पाशा पटेल यांनी मानले.