रजिस्ट्री कार्यालयावर संघर्ष समितीचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:42+5:302021-09-27T04:21:42+5:30

लातूर येथील प्रणवश्री मंगल कार्यालयात समस्त लातूरकर संघर्ष समिती व रियल इस्टेट धारक तसेच मालमत्ता खरेदी विक्रेते यांचा मेळावा ...

Struggle of the struggle committee at the registry office | रजिस्ट्री कार्यालयावर संघर्ष समितीचा आक्रोश मोर्चा

रजिस्ट्री कार्यालयावर संघर्ष समितीचा आक्रोश मोर्चा

googlenewsNext

लातूर येथील प्रणवश्री मंगल कार्यालयात समस्त लातूरकर संघर्ष समिती व रियल इस्टेट धारक तसेच मालमत्ता खरेदी विक्रेते यांचा मेळावा झाला. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मनोहर गोमारे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, ॲड.उदय गवारे, नगरसेवक हनुमंतराव जाकते, लष्कर ए भीमा संघटनेचे अध्यक्ष रणधीर सुरवसे,धनराज साठे, आनंद कोरे, एमआयएमचे ॲड. आर. झेड. हाश्मी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, शिवसेनेचे शंकर रांजणकर, रमेश माळी, हनुमंत खैरे, प्रदीप सूर्यवंशी, मुद्रांक विक्रेते दस्त लेखक वकील मंडळी यांच्यासह लातुरातील विविध पक्षीय विविध संघटनांनी जाचक परिपत्रकाचा निषेध केला. यावेळी ॲड. पाटील म्हणाले, देशाची प्रगती ही जमिनीच्या व्यवहारातून होत असून १२ जुलैचे परिपत्रक न्यायालयात टिकणार नाही.समस्त लातूरकरांनी पुकारलेल्या २० ते ३0 सप्टेंबरपर्यंतच्या काम बंद आंदोलनात जिल्ह्यातील सर्वांनी सहभागी व्हावे. यावेळी कुलदीपसिंह ठाकूर, मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा, संघर्ष समितीचे समन्वयक रामेश्वर धुमाळ, पाखरसांगवीचे उपसरपंच राजाभाऊ लखादिवे, उमेश हंडरगुळे, राजेंद्र कांबळे, प्रकाश पवार, सुनील वाडकर, शिवाजी संपत खैरे, जालिंदर बर्डे, कलीम सय्यद, महेश अलगुडे, राजकुमार शिंगण, शिवदास पवार, दगडू हंडरगुळे, रामभाऊ पवार, अनिल गुरुनाळे, शिवलिंग बोरे, वसंत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा, रेणापूर येथील रियल इस्टेट धारक खरेदी-विक्री मालमत्ताधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रामेश्वर धुमाळ यांनी केले. आभार ज्ञानेश्वर लखादिवे यांनी मानले.

Web Title: Struggle of the struggle committee at the registry office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.