लातुरात कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या मुलींच्या मोपेडला बसची धडक; एकीचा मृत्यू, एक जखमी

By संदीप शिंदे | Published: September 14, 2023 02:44 PM2023-09-14T14:44:45+5:302023-09-14T14:49:57+5:30

बार्शी रोडवरील घटना; या अपघातात मोपेड अन्य एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे

Students die after being crushed under a bus in Latur, incident on Barshi Road | लातुरात कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या मुलींच्या मोपेडला बसची धडक; एकीचा मृत्यू, एक जखमी

लातुरात कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या मुलींच्या मोपेडला बसची धडक; एकीचा मृत्यू, एक जखमी

googlenewsNext

लातूर : पुण्याहून उदगीरकडे जाणाऱ्या बसने दुपारी बार्शी रोडवरील पंजाब नॅशनल बँकेसमोर मोपेडला धडक दिली. या अपघात मोपेडवरील विद्यार्थीनी बसखाली आल्याने तिचा चिरडून जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेली मैत्रीण जखमी झाली. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. जखमी असलेल्या मुलीवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लातूरातील दोन मुली मोपेडवरून ( क्रमांक एमएच ४४ एए ४२३७ ) क्लासेसला गुरुवारी दुपारी बार्शी रोडवरुन जात होत्या. याचवेळी पुण्याहून उदगीरला जाणारी बसने ( क्रमांक एमएच २४ एयु ८०६४ ) या स्कुटीला धडक दिली. यामध्ये मोपेड चालविणारी मुलगी बसखाली आल्याने चिरडून मृत्यू पावली. यामध्ये बसचे मागील टायर गेल्याने डोक्यावरुन गेल्याने मुलीचा मेंदू बाहेर पडला होता. दरम्यान, मोपेडवरील दुसरी मुलगी जखमी झाली असून, तिच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

Web Title: Students die after being crushed under a bus in Latur, incident on Barshi Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.