प्रज्ञा शोध परीक्षेत कुलकर्णी बंधूंचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:14 AM2021-07-22T04:14:06+5:302021-07-22T04:14:06+5:30
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटीच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येते. गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने यावर्षीच्या फेब्रुवारी ...
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटीच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येते. गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, श्रीनिवास कुलकर्णी, वरुण कुलकर्णी या भावंडांनी या परीक्षेत यश मिळवले. दोघांनाही शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
या यशाबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री आ. महादेव जानकर यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन दोन्ही भावंडांचा सत्कार केला. यावेळी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, रासपचे जिल्हाध्यक्ष प्रा. विष्णू गोरे यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख रामराव रोडे, गोविंद नरवटे, अविनाश कोळी, प्रदीप मोरे, राहुल देशपांडे, दादासाहेब करपे, रासपचे पदाधिकारी आणि व्यंकटेश कुलकर्णी, जगदीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.