महात्मा फुले महाविद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:51+5:302021-09-03T04:20:51+5:30
अहमदपूर : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी बीए पदवी परीक्षेत यश ...
अहमदपूर : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी बीए पदवी परीक्षेत यश संपादन केले आहे. महाविद्यालयात पूजा चव्हाण प्रथम आली आहे. ४० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, महाविद्यालयाचा एकूण निकाल शंभर टक्के लागला आहे.
बीए पदवी अंतिम परीक्षेत पूजा चव्हाण हिने ९०.४० टक्के गुण मिळवून प्रथम, मिसबा अलिमोद्दीन शेख हिने ८९.३७ टक्के गुणांसह द्वितीय, रेणुका पुंडलिक मलकापुरे ही ८९.०३ टक्के गुणांसह तृतीय आली आहे. तसेच गणेश नरवटे, निकिता गवळे, राणी मकापल्ले, प्रियंका सोनकांबळे, योगेश हौसे, मंजुषा भदाडे, पूजा कांबळे, निखील भालेराव, निकिता कांबळे, शुभांगी टोकलवाड, जया सुरनर, रमाताई गायकवाड, संतोष तेलंगे, कुसूम देमगुंडे, हणमंत मेकाले, नीलेश रोडे, भाग्यश्री वाघमारे, कृष्णा राठोड, पूजा देशमुख, वैष्णवी भुतके, संभाजी सोळंके, प्रतिभा सुरनर, गोविंद नायने, प्रवीण कराड, कविता लिंबले, वैभव लामतुरे, प्रियंका सकनुरे, अमोल वाघमारे, अस्मिता बनसोडे, निकिता सावंत, अजित शिंदे, योगेश्री पिलवटे, कुणाल शिंदे, पवन सुरनर, सुजाता कांबळे, तेजस्विनी गायकवाड हे विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व गुणवंतांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव चामले, सचिव ज्ञानदेव झोडगे, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार आदींनी कौतुक केले.