शारदा तंत्रनिकेतनचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:42 AM2021-09-02T04:42:54+5:302021-09-02T04:42:54+5:30

औराद शहाजानी : येथील शारदा तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. सर्व शाखांचा निकाल शंभर टक्के ...

Success of Sharda Tantraniketan | शारदा तंत्रनिकेतनचे यश

शारदा तंत्रनिकेतनचे यश

Next

औराद शहाजानी : येथील शारदा तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. सर्व शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. महाविद्यालयात अभिषेक जाधव हा प्रथम आला असून, त्याला ८६.५९ टक्के गुण मिळाले आहेत.

मेकॅनिकलच्या प्रथम वर्षात आदित्य इंगळे प्रथम, हर्षवर्धन कोराळे द्वितीय, कॉम्प्युटर शाखेत सुवर्णा सहदेव गारोळे प्रथम, सुमती बजरंग भंडारे द्वितीय, सिव्हील शाखेत शेख फैय्याज इलियास प्रथम, पवन बिरादार द्वितीय आला आहे.

मेकॅनिकलच्या द्वितीय वर्षात पुष्कर तेलंग प्रथम, रितेश भंडारे द्वितीय, कॉम्प्युटरच्या द्वितीय वर्षात मोहिनी ज्ञानेश्वर पाटील व रजनी रमेश मोरे या दोघी प्रथम, सुषमा माकणे द्वितीय आली आहे.

सिव्हील द्वितीय वर्षात शेखर सूर्यवंशी प्रथम, मुल्ला समीना रहिम द्वितीय आली आहे. मेकॅनिकल तृतीय वर्षात अक्षय वांजरवाडे प्रथम, फारूक चाँदसाब शेख द्वितीय, कॉम्प्युटरच्या तृतीय वर्षात सुरज म्हेत्रे प्रथम, माडगे द्वितीय आला आहे. ई ॲण्ड टीसी तृतीय वर्षात अभिषेक जाधव प्रथम, दत्ता डांगे द्वितीय, सिव्हील तृतीय वर्षात सय्यद सना रहिम प्रथम, अश्विनी तानाजी सूर्यवंशी द्वितीय आली आहे.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे संस्थाध्यक्ष विश्वनाथराव वलांडे गुरुजी, प्राचार्य एस. व्ही. पाटील आदींनी कौतुक केले आहे.

Web Title: Success of Sharda Tantraniketan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.