शिवचंद्र स्वामी यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:57 AM2020-12-04T04:57:57+5:302020-12-04T04:57:57+5:30
अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था लातूर - शहरातील दीपज्योती नगर भागात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ...
अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
लातूर - शहरातील दीपज्योती नगर भागात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही सिमेंट रस्ते उखडले असून, नाल्याही नियमित साफ केल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्ते दुरुस्ती व नालेसफाई नियमित करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे.
विद्यार्थ्यांची वर्गात उपस्थिती वाढली
लातूर - ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होऊन आठवडा उलटला असून, आता दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. जवळपास आठशेच्या आसपास जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या आहेत. काही शाळा बंद आहेत. कारण त्या शाळेतील काही शिक्षक कोरोनाबाधित निघाले आहेत. त्यामुळे त्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ज्या शाळा सुरू झाल्या आहेत, तेथील उपस्थिती २८ टक्क्यांच्या पुढे पोहोचली आहे.
डासोत्पत्ती वाढली
लातूर - लातूर शहरामध्ये डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे डेंग्यूसारखे आजार उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, डासांचे निर्मूलन करण्यासाठी शहरात धूर फवारणी करावी, जेणेकरून डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट होतील. नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा. पाणवठे झाकून ठेवावेत. सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.