भररस्त्यात अचानक ब्रेक दाबले; तीन वाहने एकमेकांवर धडकून वाहतूक ठप्प!

By राजकुमार जोंधळे | Published: July 22, 2024 04:27 PM2024-07-22T16:27:53+5:302024-07-22T16:28:11+5:30

लातुरात विचित्र अपघात कारमधील तिघे जखमी

suddenly hit the brakes on middle of raod; Traffic stopped after three vehicles collided with each other in Latur! | भररस्त्यात अचानक ब्रेक दाबले; तीन वाहने एकमेकांवर धडकून वाहतूक ठप्प!

भररस्त्यात अचानक ब्रेक दाबले; तीन वाहने एकमेकांवर धडकून वाहतूक ठप्प!

लातूर : भरधाव छोटा टेम्पोच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी कार छोट्या टेम्पोवर जोराने धडकली. त्याच वेळी पाठीमागून येणारी बस कारवर धडकली. हा अपघातलातूर शहरातील औसा रोडवर खर्डेकर स्टॉपवर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला. यामध्ये तिघे जखमी झाल्याची माहिती असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 

लातुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजीव गांधी चौक दरम्यान शहरात येणाऱ्या छोटा टेम्पो वाहन चालकाने खर्डेकर स्टोपवर अचानक ब्रेक दाबले. पाठीमागून येणारी कार छोटा टेम्पोवर आणि एसटी बस कारवर जोराने आदळली. तर बसवर काही दुचाकीचालक आदळले. या विचित्र अपघातात कारमधील तिघे जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. 

वाहतुकीचा खोळंबा; तासाभरानंतर सुरळीत...
अपघातानंतर औसा रोडवरील छत्रपती चौकाकडून येणाऱ्या वाहनांची काहीवेळ कोंडी झाली होती. दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. जवळपास एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

Web Title: suddenly hit the brakes on middle of raod; Traffic stopped after three vehicles collided with each other in Latur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.