उसाचा ट्रॅक्टर- दाेन दुचाकींचा विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू, शिरूर- मुखेड मार्गावरील रात्री साडे आठ वाजताची घटना

By राजकुमार जोंधळे | Published: January 11, 2023 11:36 PM2023-01-11T23:36:59+5:302023-01-11T23:38:04+5:30

Accident: उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि भरधाव असलेल्या दाेन माेटरसायकलचा समाेरासमाेर अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास शिरूर ताजबंद- मुखेड महामार्गावर घडली.

Sugarcane Tractor-Dain Two-wheeler freak accident; One died on the spot, an incident at 8:30 pm on the Shirur-Mukhed road | उसाचा ट्रॅक्टर- दाेन दुचाकींचा विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू, शिरूर- मुखेड मार्गावरील रात्री साडे आठ वाजताची घटना

उसाचा ट्रॅक्टर- दाेन दुचाकींचा विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू, शिरूर- मुखेड मार्गावरील रात्री साडे आठ वाजताची घटना

Next

- राजकुमार जोंधळे
लातूर -  उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि भरधाव असलेल्या दाेन माेटरसायकलचा समाेरासमाेर अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास शिरूर ताजबंद- मुखेड महामार्गावर घडली. या अपघातात एक जागीच ठार झाला आहे. तर अन्य एक गंभीर जमखी झाला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद ते मुखेड महामार्गावर हाडाेळती परिसरात असलेल्या एका मंगल कार्यालयानजीक हा भीषण विचित्र अपघात बुधवारी रात्री झाला. उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच २६ बीक्यू १७४७) या महामार्गावरून जात हाेता. दरम्यान, भागीरथी मंगल कार्यालयानजीक ट्रॅक्टर आणि माेटारसायकल (एमएच २४ एएम ९००६), अन्य एका माेटरसायकलचा (टीएस ०८ जीआर ७४८८) समाेरासमाेर विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये माेटरसायकलवरील राजू बळीराम घाेटरे हे उसाच्या ट्रॅक्टरच्या टायरखाली आल्याने जागीच ठार झाले. तर अन्य एक माेटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यासह आणि पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तातडीने एका रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

Web Title: Sugarcane Tractor-Dain Two-wheeler freak accident; One died on the spot, an incident at 8:30 pm on the Shirur-Mukhed road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.