औराद शहाजानी येथे मिरवणूक मार्गाची पोलीस अधीक्षकांनी केली दुचाकीवरुन पाहणी
By राजकुमार जोंधळे | Published: September 3, 2022 06:08 AM2022-09-03T06:08:03+5:302022-09-03T06:08:25+5:30
- राजकुमार जाेंधळे औराद शहाजानी (जि. लातूर ) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील सर्व गणेश मंडळांची, मिरवणूक मार्गाची ...
- राजकुमार जाेंधळे
औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील सर्व गणेश मंडळांची, मिरवणूक मार्गाची जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी शुक्रवारी रात्रीच्यावेळी दुचाकीरुन पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित पाेलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
औराद शहाजनी येथे यंदा बारा गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली आहे. येथील ठाण्याच्या हद्दीत एकूण ५० गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. यातील १८ गावांमध्ये ‘एक गाव- एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गामध्ये कोणताही अडथळा येता कामा नये, यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी औराद शहाजानी दाैरा केला. दरम्यान, त्यांनी गावातील प्रमुख रस्त्यातील छाेट्या-छाेट्या मार्गाची, मिरवणूक मार्गाहीची दुचाकीवरुन पाहणी केली. यामध्ये श्री बालाजी मंदिर, वीरपाक्षेश्वर मठ, विवेकानंद चौक, महात्मा गांधी चौक, ज्ञानेश्वरी चौक, जय भवानी मंदिर येथील मिरवणूक मार्गाची पाहणी केली. गणेशोत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कामत, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे, श्रीनिवास चिटबोने, रवी काळे यांच्यासह पाेलीस कर्मचारी उपस्थित होते.