शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; काँग्रेसचे लातुरात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:58 AM2020-12-04T04:58:01+5:302020-12-04T04:58:01+5:30

कॉंग्रेस भवन येथे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार ...

Support the peasant movement; Congress's Latur Dharne Andolan | शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; काँग्रेसचे लातुरात धरणे आंदोलन

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; काँग्रेसचे लातुरात धरणे आंदोलन

Next

कॉंग्रेस भवन येथे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोदी सरकार व कृषी कायद्याच्या विरोधात जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे,ॲड. किरण जाधव, अभय साळुंके, राजेसाहेब सवई,सुपर्ण जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

धरणे आंदोलनात जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, जिल्हा परिषद सद्स्य नारायण लोखंडे, राजेसाहेब सवई, प्रविण पाटील, सचिन दाताळ, सिकंदर पटेल, स्वयंप्रभा पाटील,केशरबाई महापुरे, दगडू मिटकरी , सुलेखा कारेपूरकर,प्रविण सूर्यवंशी, हरिराम कुलकर्णी, महेश काळे,जगन्नाथ पाटील, युनुस शेख,रफिक सय्यद,व्यंकटेश पूरी, ॲड. देवीदास बोरुळे पाटील, इसरार सगरे, रमाकांत गडदे, प्रमोद जोशी, सोनू डगवाले, सचीन सूर्यवंशी, एम. पी. देशमुख, अभिषेक पतंगे,राहुल डुमने, राजू गवळी, सचिन गंगावणे, कुणाल वांगज, राज क्षीरसागर, तरबेज तांबोळी, वीरेंद्र सौताडेकर, तुषार रेड्डी, ओम भगत, गोविंद डूरे, विकास वाघमारे,बिभीषन सांगवीकर, अजिज बागवान,मेघराज देशमुख,मनोज देशमुख, प्रविण कांबळे,अजीज बागवान ,गौस गोलंदाज, सुंदर पाटील आदींचा धरणे आंदोलनात सहभाग होता.

Web Title: Support the peasant movement; Congress's Latur Dharne Andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.