महापालिकेत मिले सूर मेरा-तुम्हारा... (कुजबुज)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:21 AM2021-09-03T04:21:16+5:302021-09-03T04:21:16+5:30
आता बसू आपण.. भेटू आपण..! महापालिकेत वॉर्ड रचना असणार आहे. त्यामुळे आपापला भाग मजबूत करण्यासाठी सगळेच कामाला लागले आहेत. ...
आता बसू आपण.. भेटू आपण..!
महापालिकेत वॉर्ड रचना असणार आहे. त्यामुळे आपापला भाग मजबूत करण्यासाठी सगळेच कामाला लागले आहेत. प्रभागरचनेत नागरिक समस्या घेऊन गेला की चारजण जा याच्याकडे, जा त्याच्याकडे असे सांगून मोकळे होत होते. आता वॉर्डात मर्यादित क्षेत्रात स्वत:चा जनसंपर्क मजबूत ठेवावा लागेल. व्यक्तिगत संबंध जपणाऱ्यांना नगरसेवक होण्याची संधी आली आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकसुद्धा गल्लीबोळात वॉर्ड रचनेपूर्वी फिरू लागले आहेत. भेटेल त्याला, बसू आपण-भेटू आपण... असा संवाद सुरू आहे. रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी धडपड आहे. कचरा, पाणी, वीज, पथदिवे वगळता रस्त्याच्या कामाबाबत बहुतेकांना नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. परिणामी, रोष निर्माण होणार नाही, यासाठी उरलेल्या काळात किमान मुरुमाने खड्डे तरी बुजवावेत, असा आटापिटा सुरू आहे.