नागरसोगा येथे ड्रोनद्वारे गावठाण जागेची मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:19 AM2021-01-23T04:19:35+5:302021-01-23T04:19:35+5:30

भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मनीषा भोसले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भुजबळ यांनी हा ...

Survey of village land by drone at Nagarsoga | नागरसोगा येथे ड्रोनद्वारे गावठाण जागेची मोजणी

नागरसोगा येथे ड्रोनद्वारे गावठाण जागेची मोजणी

Next

भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मनीषा भोसले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भुजबळ यांनी हा उपक्रम राबविला. यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. या ड्रोनच्या सहाय्याने केवळ एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण होत आह. यामुळे ग्रामपंचायतीकडील अभिलेखे अद्ययावत होऊन गावच्या विकासकामास गती मिळणार आहे. तसेच आखिव पत्रिकेमुळे बँकेकडून कर्ज मिळण्यास, मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारात तसेच भविष्यात जागेबाबत वाद उद्भवल्यास तो सोडविण्यासाठी या अभिलेखांचा उपयोग होणार आहे.

विशेष म्हणजे, मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रथमच ड्रोनव्दारे सदरचे काम पार पडत असल्यामुळे व सदरचा डाटा डिजीटल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याने, नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक मनीषा भोसले म्हणाल्या, या मोजणी झालेल्या गावातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. जागेचे वाद मिटण्यास मदत होणार आहे. मालमत्तेवर कर्ज घेणे सहज शक्‍य होणार असून, मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा तयार होणार आहे.

...

Web Title: Survey of village land by drone at Nagarsoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.