लातुरात माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप; बाजार समितीसमोर निदर्शने

By संदीप शिंदे | Published: February 1, 2023 01:30 PM2023-02-01T13:30:29+5:302023-02-01T13:30:55+5:30

युनियनच्या वतीने लातूर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आले.

Symbolic strike of Mathadi workers in Latur; Demonstrations before the Market Committee | लातुरात माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप; बाजार समितीसमोर निदर्शने

लातुरात माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप; बाजार समितीसमोर निदर्शने

Next

लातूर : माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करावी, सल्लागार समितीवर युनियनच्या अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणुक करावी यासह विविध मागण्यांसाठी लातुरात महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी लाक्षणिक संप पुकारण्यात आला. दरम्यान, युनियनच्या वतीने लातूर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आले.

माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, कामगारांची मजुरी वेळेवर माथाडी मंडळात भरणा न केल्यास ५० टक्के दंड आकारावा, माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दूर करण्यासंबंधी विशेष समिती गठीत करावी, रेल्वे यार्डात माथाडी कामगारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

संपात  युनियनचे लातूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जाधव, दिलीप कांबळे, माणिक पाडूळे, नागेश मगर, जीवन भालेराव, गोविंद गवळी, बाळासाहेब कांबळे, विनोद गायकवाड, दादा गवळी, ज्ञानेश्वर खमामे, दत्ता गवळी, विजय सुरवसे, मारूती गुळगे, भिमा कांबळे, रसुल शेख, दत्ता काळे, भगवान बनसोडे, पिंटू ठाकूर, युवराज ससाणे, अकबर शेख, दिनेश पाडूळे, किसन गुळगे, त्र्यंबक गोडबोले, राजू जगताप, रमेश पाटील, तसेच महिला कामगार आरूणाबाई मोरे, अनिता सोनकांबळे, नंदाबाई सुर्यवंशी, शांताबाई धावारे, इंदूबाई बनसुडे एमआयडीसी येथील दयानंद खडागळे ,परमेश्वर कोठे, वंसत भालेराव, सिध्दार्थ रिद्धीवाड, रवींद्र जोगदंड, महादेव सोनवणे, महादेव ढमाले, शिवाजी मोठे, दिपक गुप्ता, बालाजी सुरवसे, तुकाराम पाटील, उत्तम पोतने आदींचा सहभाग होता.

Web Title: Symbolic strike of Mathadi workers in Latur; Demonstrations before the Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.