कंत्राटी सफाई कामगारांना कमी मानधन देणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:14 AM2021-07-03T04:14:15+5:302021-07-03T04:14:15+5:30
येथील उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार १० ते १५ वर्षांपासून काम करतात. कोरोनाच्या संकटाच्या काळात या सफाई कामगारांनी ...
येथील उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार १० ते १५ वर्षांपासून काम करतात. कोरोनाच्या संकटाच्या काळात या सफाई कामगारांनी जीवाची पर्वा न करता काम केले आहे. दरम्यान, ठेकेदाराने १२ कामगारांना मार्चपासून कामावरून कमी केले आहे. या कामगारांना शासन ८ हजार ४६० रूपये मासिक मानधन देत असले तरी संबंधित ठेकेदार कपातीच्या नावाखाली तुटपुंजी रक्कम देत आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे मानधन देण्यात यावे. तसेच अन्यायग्रस्त कामगारांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, सोमनाथ कदम, शरद गायकवाड, अजय कांबळे, उमेश सूर्यवंशी, बालाजी कांबळे, मुजीब सौदागर, नईम खतीब यांच्यासह कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील यांनी केली आहे.