Talathi Exam: सर्व्हर डाऊनमुळे तलाठी परीक्षा खोळंबली, विद्यार्थी संतप्त

By संदीप शिंदे | Published: August 21, 2023 11:23 AM2023-08-21T11:23:00+5:302023-08-21T11:23:52+5:30

१० वाजता सर्व्हर सुरळीत झाल्यावर केंद्रात प्रवेश

Talathi Exam: Talathi exam disrupted due to server down, students angry | Talathi Exam: सर्व्हर डाऊनमुळे तलाठी परीक्षा खोळंबली, विद्यार्थी संतप्त

Talathi Exam: सर्व्हर डाऊनमुळे तलाठी परीक्षा खोळंबली, विद्यार्थी संतप्त

googlenewsNext

लातूर/ छत्रपती संभाजीनगर : लातूर जिल्ह्यातील सात परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा होत असून, सोमवारी सकाळी ९ वाजता पेपर असल्याने विद्यार्थ्यांना केंद्रावर ७.३० वाजता बोलाविण्यात आले होते. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्या. त्यामूळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्राबाहेर गोंधळ घातला. तसेच अंबेजोगाई रोडवर काही वेळासाठी रास्ता रोको आंदोलनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तातडीने मध्यस्थी केली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे देखील अनेक केंद्रांवर परीक्षा उशिरा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

लातूर जिल्ह्यात १७ ऑगस्टपासून सात सेंटरवर तलाठी भरतीची परीक्षा होत आहे. सोमवारी सकाळी परीक्षेसाठी केंद्रावर ७.३० वाजता विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने ९ वाजेपर्यंत प्रवेश देण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर गोंधळ घातला. तसेच अंबेजोगाई रोडवरील एका परीक्षा केंद्रासमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने धाव घेत विद्यार्थ्यांची समजूत काढली. दरम्यान, सर्व्हर १० वाजता सुरळीत झाल्यावर १०.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आले. दरम्यान त्यांना वाढीव वेळ देण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

छत्रपती संभाजीनगरमधेही गोंधळ 

सर्व्हर डाऊन असल्याने  एक तास परीक्षा उशीरा सुरू झाली. मात्र,  वाळूज, चिकलठाणा , दर्गारोड आदी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी संतत्प झाले होते. आधीच जे परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांनी दिले होते ते देण्यात आले नाही. त्यात आता सर्व्हर डाऊन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

Web Title: Talathi Exam: Talathi exam disrupted due to server down, students angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.