१० शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:30+5:302021-09-05T04:24:30+5:30
शिरूर अनंतपाळ पंचायत समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक निवडीसाठी सभापती डॉ. नरेश चलमले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पंचायत समिती ...
शिरूर अनंतपाळ पंचायत समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक निवडीसाठी सभापती डॉ. नरेश चलमले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी उपसभापती उद्धव जाधव, सदस्या वर्षाताई भिक्का, सुमनताई गंभिरे, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, गटशिक्षणाधिकारी अनिल पागे, विस्तार अधिकारी गोवर्धन चपडे, केंद्रप्रमुख शिवाजी एरंडे, विठ्ठल वाघमारे यांची उपस्थिती होती. तालुक्यातील पाच केंद्रांतील १० शिक्षकांची आदर्श पुरस्कारासाठी, तर एका शिक्षकाची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तसेच गटसाधन केंद्रातील एक आणि पंचायत समिती शिक्षण विभागातील एक अशा दोन कर्मचाऱ्यांचीही निवड करण्यात आली.
पुरस्कारासाठी निवड झालेले शिक्षक...
सिद्राम चौंसष्टे (प्रा. शा. शेंद उत्तर), रंजना तोटे (के. प्रा. शा. शिरूर अनंतपाळ), विजयकुमार बिराजदार (के. प्रा. शा. तळेगाव), सीमा जाधव (प्रा. शा. डिगोळ), सखुबाई मोघे (के.प्रा.शा. रापका), सुग्रीव सोनवणे (प्रा. शा. लक्कड जवळगा), राम दत्तनगिरे (प्रा. शा. अजनी), प्रदीप क्षीरसागर (प्रा. शा. हालकी), प्रदीप गोडसे (प्रा. शा. गणेशवाडी), उत्तम कुलबुर्गे (प्रा. शा. उमरदरा), विशेष पुरस्कार - तुकाराम पाटील (प्रा. शा. धामणगाव), आनंद ढगे (लिपिक, पंचायत समिती), सुनील सातपुते (साधन व्यक्ती) यांचा समावेश आहे.