कार-ट्रॅक्टरच्या धडकेत भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षाचा मृत्यू
By राजकुमार जोंधळे | Updated: March 6, 2024 00:21 IST2024-03-06T00:21:42+5:302024-03-06T00:21:51+5:30
कारमधील भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा गयादेवी सिरसाठ यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती प्रकाश सिरसाठ हे गंभीर जखमी झाले आहेत.

कार-ट्रॅक्टरच्या धडकेत भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षाचा मृत्यू
अहमदपूर (जि. लातूर) : कार-ट्रॅक्टर भीषण अपघातात भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष ठार झाल्याची घटना अहमदपूर-अंबाजोगाई महामार्गावरील लांजी पाटीनजीक मंगळवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात त्याचे पती गंभीर जखमी झाले आहेत. गयादेवी सिरसाठ, असे मयताचे नाव आहे.
अहमदपूर येथील भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष गयादेवी सिरसाठ या मंगळवारी सिरसाठवाडी येथील सप्ताहाला गेल्या होत्या. दरम्यान, सप्ताह संपल्यानंतर त्या अहमदपूरकडे येऊन परत किनगावमार्गे लातूरला जात होते. दरम्यान, लांजी पाटीनजीक मंगळवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर आणि कार (ए.पी. ९ बी.ए. ३३००) या भीषण अपघात झाला.
कारमधील भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा गयादेवी सिरसाठ यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती प्रकाश सिरसाठ हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला रात्री उशिरा पाठविण्यात आले. अपघात एवढा भीषण हाेता की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.