२८८ जागा लढविण्याची वंचित आघाडीची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 05:47 AM2019-09-07T05:47:45+5:302019-09-07T05:47:48+5:30
भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणींमार्फत राज्यात स्वतंत्ररीत्या पक्षाचे काम करण्यात येत
अकोला /लातूर : विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ जागा लढविण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी असून, किमान ५० टक्के जागांवर ‘ओबीसीं’ना संधी देण्यात येईल, असे आघाडीच्या देखरेख समितीचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर यांनी शुक्रवारी सांगितले.
भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणींमार्फत राज्यात स्वतंत्ररीत्या पक्षाचे काम करण्यात येत असून, भारिप-बमसं आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये समन्वय राखण्यासाठी देखरेख समिती गठित करण्यात आली आहे.
वंचितची सत्ता संपादन रॅली नागपूर येथे ८ सप्टेंबर रोजी संविधान चौकातून निघणार असून १८ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे या समारोप होणार असल्याची माहिती अॅड़ अण्णाराव पाटील यांनी दिली.