जाती पातीला नाही दिला थारा, हिंदू- मुस्लिम केला एक सारा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:35 AM2021-02-18T04:35:15+5:302021-02-18T04:35:15+5:30
मंगळवारी शिवशाहीर राजेंद्र कांबळे व सहकारी टीम यांनी शिवचरित्र पोवाड्यातून उलघडला. शिवकालीन शेतकरी कष्टक-यांची व्यथा पोवाड्यातून मांडत शिवरायांनी ...
मंगळवारी शिवशाहीर राजेंद्र कांबळे व सहकारी टीम यांनी शिवचरित्र पोवाड्यातून उलघडला. शिवकालीन शेतकरी कष्टक-यांची व्यथा पोवाड्यातून मांडत शिवरायांनी केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती सांगीतली. तसेच आपल्यातील प्रत्येकांनी शाहु ,फुले, आंबेडकरां बरोबरच जिजाऊ आणि शिवरायांचे विचार मनात मनात रुजले पाहिजेत. हा मौलिक संदेश ही दिला. इतिहासात शिवरायांचा खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र महात्मा फुले आणि शाहिर अमर शेख यांनी खरा इतिहास पोवाडा शाहिरीतून जगासमोर मांडला असल्याचे सांगीतले. यावेळी दावणगाव येथील सोसायटीचे व्हा. चेअरमन, नूतन ग्रामपंचायत सदस्य धनाजी मुळे, प्रा. श्याम डावळे, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, सतीश पाटील मानकीकर, अहमद सरवर, डाॅ. अंजुम खादरी, मनोरमा पाटील, केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे, अनिता यलमटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष गजानन सताळकर, नीता मोरे, बिपीन पाटील, नरेश सोनवणे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप ढगे, अजीम दायमी यांच्यासह मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येनी उपस्थित होते. सतत दोन तास चाललेल्या या पोवाड्यातून शिवशाहिर राजेंद्र कांबळे यांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली.