मुक्कामी बसने अचानक घेतला पेट; आतमध्ये झोपलेल्या चालक-वाहकाने खिडकीतून घेतली उडी

By संदीप शिंदे | Published: January 8, 2024 06:14 PM2024-01-08T18:14:24+5:302024-01-08T18:15:24+5:30

गाढ झोपेत असलेल्या वाहक व चालकाने बसच्या खिडकीतून उड्या मारून आपला जीव वाचवला.

The bus caught fire suddenly; The driver-carrier, who was asleep inside, narrowly escaped | मुक्कामी बसने अचानक घेतला पेट; आतमध्ये झोपलेल्या चालक-वाहकाने खिडकीतून घेतली उडी

मुक्कामी बसने अचानक घेतला पेट; आतमध्ये झोपलेल्या चालक-वाहकाने खिडकीतून घेतली उडी

जळकोट : उदगीर आगाराची उदगीर-उमरदरा मुक्कामी बसला रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागल्याने जळून खाक झाली. वाहक व चालकाने प्रसंगवधान राखत गाडीतून उड्या मारून आपला जीव वाचवला.

उदगीर-उमरदरा ही उदगीर आगाराची एमएच २० बीएल १४५४ क्रमांकाची बस उमरदरा येथे मुक्कामाला असते. रविवारी रात्री साडेनऊ वाजता बस उमरदरा गावाजवळ आल्यानंतर अचानक बंद पडली. त्यामुळे बसमधील प्रवासी गेल्यानंतर वाहक व चालकांनी गाडीतच मुक्काम केला. मात्र, अचानक रात्री दीडच्या सुमारास लाईट बंद-चालू होऊन स्पार्किंग झाल्याने बसला आग लागली.

गाढ झोपेत असलेल्या वाहक व चालकाने बसच्या खिडकीतून उड्या मारून आपला जीव वाचवला. या आगीत बस जळून खाक झाली. वाहक व चालकाने डेपो व पोलीस ठाण्याशी संपर्क साधून अग्निशामक दलाची गाडी बोलावली. अग्नीशमन दलाने आग आटाेक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बस जळून खाक झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: The bus caught fire suddenly; The driver-carrier, who was asleep inside, narrowly escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.