खड्डा चुकविताना कार अनियंत्रित होऊन उलटली; पाच जण गंभीर

By संदीप शिंदे | Published: August 26, 2023 03:26 PM2023-08-26T15:26:10+5:302023-08-26T15:26:32+5:30

लातूर-जहिराबाद महामार्गावरील हलगरा पाटीजवळील घटना; कार रस्त्याच्या बाजूस असलेल्या खड्यात उलटून जवळपास २०० फुट फरफटत गेली.

The car went out of control while avoiding a pothole; Five people are critical | खड्डा चुकविताना कार अनियंत्रित होऊन उलटली; पाच जण गंभीर

खड्डा चुकविताना कार अनियंत्रित होऊन उलटली; पाच जण गंभीर

googlenewsNext

औराद शहाजानी (जि.लातूर) : लातूर- जहिराबाद महामार्गावरील हलगरा पाटीजवळ खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविताना कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मार्गानजिकच्या खड्ड्यात कार उलटून पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर निलंग्याच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन त्यांना लातूरला पाठविण्यात आले.

लातुर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील हलगरा पाटीजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. शनिवारी सकाळी निलंग्याहून औराद शहाजानीकडे भरधाव वेगात कार (एमएच. २४ एडब्लू. ६५४९) येत होती. दरम्यान, हलगरा पाटीजवळ खड्डे पाहून चालक ते चुकविण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूस असलेल्या खड्यात उलटून जवळपास २०० फुट फरफटत गेली. तेव्हा कारमधील प्रवासी बाहेर फेकले गेले. यातील प्रवासी गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी निलंगा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात चालक उमेश गोरोबा कसबे (वय ३० रा. औसा), आकाश भगवान शिंदे (वय २८ रा. औसा), राजेंद्र साखरे (वय ३० रा. सांगवी), शंकर काळे (रा. लातूर), प्रदीप शिंदे (रा. अंबुलगा) हे पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात पाहून शेतकरी अझहर युसुफ शेख यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना निलंग्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रथमोपचारानंतर जखमींना लातूरला पाठविण्यात आले.

Web Title: The car went out of control while avoiding a pothole; Five people are critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.