महामंडळाचा कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी पाचशेची लाच घेताना लिपिकाला एसीबीने पकडले

By हरी मोकाशे | Published: May 22, 2023 06:53 PM2023-05-22T18:53:21+5:302023-05-22T18:54:17+5:30

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. च्या एक लाख रुपये थेट कर्ज योजनेअंतर्गत तक्रारदाराने प्रस्ताव सादर केला होता.

The clerk was caught by ACB while accepting a bribe of Rs 500 for sanctioning the loan proposal of the corporation | महामंडळाचा कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी पाचशेची लाच घेताना लिपिकाला एसीबीने पकडले

महामंडळाचा कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी पाचशेची लाच घेताना लिपिकाला एसीबीने पकडले

googlenewsNext

लातूर : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळअंतर्गत एक लाख रुपये थेट कर्ज योजनेचा प्रलंबित प्रस्ताव मंजुरीसाठी मदत करून मुख्य कार्यालयास पाठविण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना कार्यालयातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना सोमवारी लातुरात घडली. याप्रकरणी गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. च्या एक लाख रुपये थेट कर्ज योजनेअंतर्गत तक्रारदाराने प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव प्रलंबित राहिला होता. दरम्यान, तो प्रस्ताव मंजुरीसाठी मदत करून मुख्य कार्यालयास पाठविण्यासाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील लिपिक तातेराव काशिनाथ जाधव याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तेव्हा तक्रारदाराने पहिल्या टप्प्यात ५०० रुपये आणि उर्वरित लाचेची रक्कम काम झाल्यानंतर देण्याचे मान्य केले.

दरम्यान, काही वेळाने ५०० रुपये घेऊन तक्रारदार हा सदरील लिपिकाकडे गेला. हे दोघे कार्यालयाच्या बाहेर भेटले. त्यानंतर ५०० रुपयांची लाच घेताना लिपिक तातेराव जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Web Title: The clerk was caught by ACB while accepting a bribe of Rs 500 for sanctioning the loan proposal of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.