पत्नीच्या सिझेरियनचा खर्च साेसेना; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By राजकुमार जोंधळे | Published: October 10, 2022 07:31 PM2022-10-10T19:31:26+5:302022-10-10T19:32:12+5:30

लातुरातील घटना : तरुणाविराेधात गुन्हा दाखल

The cost of the wife's caesarean section was not covered; Husband's suicide attempt | पत्नीच्या सिझेरियनचा खर्च साेसेना; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीच्या सिझेरियनचा खर्च साेसेना; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

लातूर : बीड जिल्ह्यातील वाका (ता. परळी वैजनाथ) येथील २८ वर्षीय तरुणाने पत्नीच्या सिझेरियनचा खर्च साेसत नसल्याच्या कारणावरुन दाेनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना लातुरातील पाण्याची टाकी परिसरात घडली. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, पाेलीस हवालदार मयूर कडाजीराव मुंगळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. रविवार, ९ ऑक्टाेबर राेजी दुपारी ३.३५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीसह हाेमगार्ड भाले हे दाेघे पाेलीस ठाण्याकडे निघाले हाेते. दरम्यान, पाण्याच्या टाकीनजीक असलेल्या एका इडली गृहासमाेर गर्दी झालेली हाेती. तेथे विनाेद घुराजी माने हा तरुण विद्युत तारेला धरुन खाली उडी मारण्याच्या प्रयत्नात हाेता. ताे विद्युत खांबावर चढत असताना लाेकांनी विद्युत विभागाला फाेनकरुन वीज बंद करण्यास सांगितले हाेते.

लाेकांनी सांगूनही त्याने उडी मारल्याने त्याच्या कमरेला मार लागला. त्यास उठता येत नव्हते. त्याला रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तेथेही बाथरुमच्या काचेने मारुन घेण्याचा प्रयत्न केला. तीन मुलींनंतर मुलगा झाला मात्र, पत्नीच्या सिझेरियनचे बील देण्यासाठी पैसे नसल्याने तरुणाने दाेनदा आत्महत्येचा प्रयत्न केला, असे एमआयडीसी ठाण्याचे पाेलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांनी सांगितले. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे.

Web Title: The cost of the wife's caesarean section was not covered; Husband's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.