अवैध दारुप्रकरणी ३१ जणांना न्यायालयाने ठाेठावला सव्वा लाखांचा दंड !

By राजकुमार जोंधळे | Published: September 30, 2022 07:36 PM2022-09-30T19:36:50+5:302022-09-30T19:37:35+5:30

चार लाखांचा मुद्देमाल जप्त : ‘राज्य उत्पादन शुल्क‘ची कारवाई

The court fined 31 people in the case of illegal liquor. | अवैध दारुप्रकरणी ३१ जणांना न्यायालयाने ठाेठावला सव्वा लाखांचा दंड !

अवैध दारुप्रकरणी ३१ जणांना न्यायालयाने ठाेठावला सव्वा लाखांचा दंड !

Next

लातूर : अवैध दारुप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथाकने केलेल्या कारवाईत तब्बल ३१ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, लातूर, उदगीर येथील न्यायालयाने त्यांना १ लाख २८ हजार ५०० रुपयांचा दंड ठाेठावला आहे. दरम्यान, २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

लातूरचे प्रभारी अधीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारुन दुचाकी, चारचाकी वाहनासह ४ लाख ६ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबराेबर २९ सप्टेंबर राेजी रात्री उशिरा अवैध, हाॅटेल, धाबा, औसा राेडवरील धाब्यावर मद्यपी आणि मालकांवर पथकाने कारवाई केली. त्यांच्याविराेधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या कलम ६८ आणि ८४ अन्वये कारवाई करण्यात आली. दाेन दिवसात पथकाकडून एकूण १६ गुन्ह्यात ३१ जणांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी धाबा, हाॅटेल मालकांना प्रद्यप्रशासन करणाऱ्यांना न्यायालयाने १ लाख २८ हजार ५०० रुपयांचा दंड ठाेठावला आहे. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग लातूरचे अधीक्षक अभिजित देशमुख, निरीक्षक आर. एम. बांगर, निरीक्षक आर.एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल.बी. माटेकर, ए.के. शिंदे, स्वप्नील काळे, अ.ब. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक ए.एल. कारभारी, गणेश गाेले, जवान अनिरुद्ध देशपांडे, हनमंत मुंडे, संताेष केंद्रे, सुरेश काेळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार यांच्या पथकाने केली.

 

Web Title: The court fined 31 people in the case of illegal liquor.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.