कुटुंब देवदर्शनाला गेले; गावाकडे चाेरट्याने घर साफ केले !

By राजकुमार जोंधळे | Published: March 28, 2023 07:04 PM2023-03-28T19:04:33+5:302023-03-28T19:04:45+5:30

देवणी तालुक्यातील बाेराेळची घटना

The family went to Devdarshan; Cleaned the house with a charm near the village! | कुटुंब देवदर्शनाला गेले; गावाकडे चाेरट्याने घर साफ केले !

कुटुंब देवदर्शनाला गेले; गावाकडे चाेरट्याने घर साफ केले !

googlenewsNext

लातूर : देवदर्शनासाठी गेल्यानंतर गावाकडे चाेरट्यांनी बंद घर फाेडून तब्बल साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना देवणी तालुक्यातील बाेराेळ येथे घडली. याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी श्रीकांत दिगांबरराव बिरादार (वय ३८, रा. बाेराेळ) हे घराला टाळे लावून २६ मार्च राेजी देवदर्शनासाठी जात हाेते. दरम्यान, वाटेत छत्रपती संभाजीनगरला थांबले असता नातेवाइकांनी घर फाेडल्याबाबतची माहिती त्यांना फाेनवरून दिली. फिर्यादी श्रीकांत बिरादार हे तातडीने बाेराेळ गावाकडे परतले आणि घराची पाहणी केली. यावेळी चाेरट्यांनी घर फाेडल्याचे त्यांना आढळून आले. 

अज्ञात चाेरट्याने घरातील स्टाेअर रूमचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. घरात ठेवलेल्या बॅगमधील चावी घेऊन कपाट आणि पेटी उघडून त्यात ठेवलेले जवळपास १५ ताेळे साेन्या-चांदीचे दागिने (किंमत ४ लाख ५० हजार रुपये) लंपास केले. या घटनेची माहिती त्यांनी पाेलिसांना दिली. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास देवणी पाेलिस करत आहेत.

Web Title: The family went to Devdarshan; Cleaned the house with a charm near the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.