Latur: अपघातात दाेघांचा बळी घेणाऱ्या चाैघांना अटक, औशात दोन दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 11:30 PM2024-10-02T23:30:04+5:302024-10-02T23:30:19+5:30
Latur Crime News: औसा येथील पाहुण्यांना भेटून रविवारी रात्री पत्नीसह दाेन मुलांना घेऊन दुचाकीवरुन लातूरकडे निघालेल्या दुचाकीला भरधाव कारने उडवले. हा अपघात रविवारी रात्री बुधोडा ते पेठ दरम्यान घडला. यामध्ये पत्नी, मुलगी जागीच ठार झाली.
- राजकुमार जाेंधळे
लातूर - औसा येथील पाहुण्यांना भेटून रविवारी रात्री पत्नीसह दाेन मुलांना घेऊन दुचाकीवरुन लातूरकडे निघालेल्या दुचाकीला भरधाव कारने उडवले. हा अपघात रविवारी रात्री बुधोडा ते पेठ दरम्यान घडला. यामध्ये पत्नी, मुलगी जागीच ठार झाली. तर दुचाकीचालक, मुलगा गंभीर जखमी झाला. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाैघांना अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, रविवारी रात्री ९ वाजता बुधोडा ते पेठ दरम्यान हासाळा पाटी येथे कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले हाेते. अपघाताच्या दुसऱ्यादिवशी वास्तव समाेर आले. पाच जण (एम.एच. ४४ जी. ०९७०) कारमधून औसा येथून लातूरकडे निघाले हाेते. यावेळी फिर्यादीही सादीक शेख हे दुचाकीवरुन (एम.एच. १३ सी.ई. ७२३३) आपल्या परिवारासह लातुरातील घराकडे निघाले हाेते. यावेळी कारचालकाकडून रस्त्यावरील वाहनांना कट मारणे, शिवीगाळ करणे, आरडाओरडा करुन कार वेडीवाकडी चालविणे, असे प्रकार सुरु हाेते. फिर्यादीच्या दुचाकीलाही कारने कट मारली. यावेळी सादिक शेख यांनी विचारपूस केली असता कारमधील चार-पाच जणांसाेबत बाचाबाची झाली. रात्री दोन चिमुकल्यासह पती-पत्नी दुचाकीवरुन प्रवास करत हाेते. दुचाकी पुढे गेल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या कारने जाराेने उडवले. यामधये ईकरा सादीक शेख, नादिया शेख हे जागीच ठार झाले. तर सादीक आणि मुलगा आहाद हा गंभीर जखमी झाला.
याबाबत औसा पाेलिस ठाण्यात दिगंबर पाटोळे, कृष्णा वाघे, बसवराज धोत्रे, मनोज माने आणि मुदामे याच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, असे फौजदार कपील पाटील यांनी सांगितले.