मांजरा धरणात मोठ्याप्रमाणात आवक वाढली; २४ तासात ५.७१ दलघमी पाणीसाठ्यात वाढ
By हणमंत गायकवाड | Published: July 14, 2022 02:06 PM2022-07-14T14:06:33+5:302022-07-14T14:07:14+5:30
मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत २५५ मी पाऊस झाला असून गेल्या २४ तासांमध्ये ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- हणमंत गायकवाड
लातूर : मांजरा प्रकल्प क्षेत्रात गेल्या २४ तासात ५० मिमी पाऊस झाला असून या कालावधीत ५.७१ दलघमी पाण्याची वाढ झाली आहे. दरवर्षी परतीच्या पावसात धरणात पाणी साठा वाढत असे. यंदा मात्र प्रारंभीच्या पावसातच पाणी साठ्यामध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. २७% वरून ३१ टक्क्यांवर पाणीसाठा गेल्याने दिलासा मिळाला असून तासाला ०.२०दलघमी पाण्याची आवक धरणात होत आहे.
मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत २५५ मी पाऊस झाला असून गेल्या २४ तासांमध्ये ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. तासाला ०.२० दलघमी पाण्याची आवक आहे. सध्या प्रकल्प पाणी पातळी 638.62 मीटर आहे तर प्रकल्पात पाणीसाठा १०२.७९३ दलघमी असून जिवंत पाणीसाठा ५५.६६३ दलघमी आहे. तर जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी ३१.४५% आहे. जून पासून १४ जुलै पर्यंत म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात ८.३७ दलघमी नवीन पाणी प्रकल्पात आले आहे.