नयनरम्य फटाक्यांच्या आतषबाजीने सिद्धेश्वर यात्रेची सांगता

By संदीप शिंदे | Published: March 8, 2023 06:00 PM2023-03-08T18:00:21+5:302023-03-08T18:00:39+5:30

महाशिवरात्रीच्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी यात्रेचा शुभारंभ झाला. या कालावधीत लाखो भाविकांनी श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वराचे दर्शन घेतले.

The Siddheshwar Yatra concludes with the picturesque firework display | नयनरम्य फटाक्यांच्या आतषबाजीने सिद्धेश्वर यात्रेची सांगता

नयनरम्य फटाक्यांच्या आतषबाजीने सिद्धेश्वर यात्रेची सांगता

googlenewsNext

लातूर : मागील १८ दिवसांपासून सुरू असणाऱ्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची फटाक्यांच्या आतषबाजीने सांगता झाली. रंगीबेरंगी हजारो फटाक्यांच्या आतषबाजीने देवस्थानचा आसमंत उजळून निघाला.

महाशिवरात्रीच्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी यात्रेचा शुभारंभ झाला. या कालावधीत लाखो भाविकांनी श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वराचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त बच्चे कंपनी व तरुणांनी आनंदनगरीचा आनंद लुटला. या कालावधीत कीर्तन, भजन, श्री सिद्धेश्वर कृषी महोत्सव व पशुप्रदर्शन, १००१ महिलांकडून रुद्राभिषेक, पाककला स्पर्धा आदी उपक्रम झाले. या उपक्रमांनाही भरभरून प्रतिसाद मिळाला. देवस्थानच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेला राज्यातील मल्लांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोमवारी रात्री परंपरेप्रमाणे फटाक्यांच्या आतषबाजीने यात्रेची सांगता झाली. रात्री ८ वाजता प्रशासक सचिन जांबूतकर व मधुकर गुंजकर यांच्या हस्ते आतषबाजीस प्रारंभ झाला. बराच काळ आतषबाजी सुरू होती. आतषबाजीच्या माध्यमातून विविध देखावे सादर करण्यात आले. यात शिवलिंग, श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचे नाव, विविध प्रकारच्या आकृत्या यांचा समावेश होता. या आतषबाजीने उपस्थित भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
यावेळी देवस्थानचे प्रशासक तथा निरीक्षक सचिन जांबूतकर, ज्येष्ठ विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले, विशाल झांबरे, ओम गोपे यांच्यासह विश्वस्त मंडळातील सदस्यांची उपस्थिती होती. यात्रा काळात सहकार्य केल्याबद्दल देवस्थानच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

 

Web Title: The Siddheshwar Yatra concludes with the picturesque firework display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.