राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक फलक काेसळला; दुचाकीस्वार ठार 

By राजकुमार जोंधळे | Published: June 8, 2024 08:36 PM2024-06-08T20:36:44+5:302024-06-08T20:37:02+5:30

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील घटना, सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेला दिशादर्शक फलक अचानक काेसळला.

The signpost on the national highway turned yellow; Bike rider killed at latur | राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक फलक काेसळला; दुचाकीस्वार ठार 

राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक फलक काेसळला; दुचाकीस्वार ठार 

अहमदपूर (जि. लातूर) : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक ३६१) असलेला दिशादर्शक फलक काेसळला. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर इतर दाेन वाहनांचेही नुकसान झाले आहे. ही घटना अहमदपूर - शिरूर ताजबंददरम्यान महादेववाडी येथे शनिवारी सायंकाळी घडली.  

अहमदपूर ते शिरूर ताजबंद मार्गावरील महादेववाडी पाटीनजीक नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे दिशादर्शक फलक काेळसला. यामध्ये अहमदपूरकडून शिरूर ताजबंदकडे ज्ञानेश्वर बालाजी साके (वय २९, रा. आष्टा ता. चाकूर) हा दुचाकीवरुन (एम.एच २० बी.एच. ७७०१) निघाला हाेता. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेला दिशादर्शक फलक अचानक काेसळला.

यामध्ये दुचाकीस्वार ज्ञानेश्वर साके हा जागीच ठार झाला. त्याचबराेबर शिरूर ताजबंदकडे निघालेल्या एका महिंद्रा बोलेरो जिप आणि कारचेही नुकसान झाले. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मयत ज्ञानेश्वर बालाजी साके यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली आहेत. 

ज्ञानेश्वर साके उत्तम मृदंग वादक...

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महमार्गावरील दिशार्शक फलक काेसळून ठार झालेल्या ज्ञानेश्वर साके हा युवक उत्तम मृदंगवादक हाेता. ताे वारकरी सांप्रदायातील असल्याने भजन-किर्तन करत हाेते. ते अहमदपूरकडून गावाकडे निघाले असता ही घटना घडली.

Web Title: The signpost on the national highway turned yellow; Bike rider killed at latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.