गणेशाेत्सव कालावधीत ट्रॅफिक ॲम्बेसेेडर घालणार प्रबाेधन जागर!

By राजकुमार जोंधळे | Published: September 21, 2023 09:17 PM2023-09-21T21:17:07+5:302023-09-21T21:17:50+5:30

पथनाट्यातून जनजागृती, विधायक उपक्रमाचा असाही ‘लातूर पॅटर्न’

The traffic police will make arrangements for motorists during Ganesh festival period | गणेशाेत्सव कालावधीत ट्रॅफिक ॲम्बेसेेडर घालणार प्रबाेधन जागर!

गणेशाेत्सव कालावधीत ट्रॅफिक ॲम्बेसेेडर घालणार प्रबाेधन जागर!

googlenewsNext

राजकुमार जाेंधळे / लातूर : वाहतुकीला शिस्त लावण्याबराेबरच अपघात राेखण्यासाठी श्री गणेशाेत्सव काळात लातूर शहरात ‘ट्रॅफिक ॲम्बेसेडर’ प्रबाेधनाचा जागर घालणार आहेत. विविध चाैकात, गर्दीच्या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम, सुरक्षेबाबत जनजागृती करणार आहेत. पाेलिसांच्या अनाेख्या विधायक उपक्रमाचा हा ‘लातूर पॅटर्न’ ठरणार आहे.

जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या कल्पकतेतून लातुरात ट्रॅफिक ॲम्बेसेेडरचा उपक्रम सुरू झाला आहे. लातूर शहर उपविभागीय पाेलिस अधिकारी भागवत फुंदे, लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पाेलिस निरीक्षक गणेश कदम यांच्या पथकाच्या वतीने या उपक्रमासाठी नियाेजन, प्रशिक्षण आणि अंमलबजावणी केली जात आहे. लातूर जिल्हा पाेलिस दलाच्या ॲपवर इच्छुक नागरिकांनी ऑनलाइन नाेंदणी करण्याचे आवाहन केले हाेते. या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. ॲपवर नाेंदणी झालेल्यांची निवड पाेलिस दलाच्या वतीनेे करण्यात आली आहे. निवड झालेल्या ट्रॅफिक ॲम्बेसेेडरला पाेलिस दलाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले असून, वाहतूक नियम आणि सुरक्षेबाबत प्रबाेधन करणारे फलक तयार केले आहेत. ज्या ट्रॅफिक ॲम्बेसेेडरला आठवड्यात ठरवून दिलेली वेळ आहे. त्या-त्या वेळी ते चाैका-चाैकात हाती फलक घेऊन प्रबाेधन करत आहेत.

प्रबाेधनासाठी संस्थाचा पुढाकार...

लातूर पाेलिस दलाबराेबरच राेटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल, लातूर वृक्ष टीम, राेटरी क्लब ऑफ लातूर मिडटाउन, वृक्ष प्रतिष्ठान, ग्रीन वृक्ष लातूर टीम, मानव विकास संरक्षण समिती, राेटरी क्लब ऑफ हाेरायन, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, पाेलिस मित्र आणि एनसीआयबी ऑफिसर आदी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

उत्सव काळात विविध स्पर्धा...

वाहतुकीच्या नियमांचे पालन, अपघात राेखण्यासाठी जनजागृती माेहीम हाती घेतली आहे. श्री गणेशाेत्सव काळात मंडळासमाेर, जनजागृतीसाठी पथनाट्य, देखावे सादर केले जातील. चित्रकला, रांगाेळीसह इतर स्पर्धा हाेणार आहेत. गणेश मंडळासमाेरील एलईडी स्क्रीनवर प्रबाेधन केले जाणार आहे. श्रींच्या मिरवणुकीदरम्यान गर्दीत नियमांचे पालन करण्यासाठी ट्रॅफिक ॲम्बेसेेडर मदत करणार आहेत.

Web Title: The traffic police will make arrangements for motorists during Ganesh festival period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर