अख्खे कुटुंब लग्नाला गेले; इकडे चाेरट्यांनी घर साफ केले !
By राजकुमार जोंधळे | Published: May 25, 2023 01:00 PM2023-05-25T13:00:18+5:302023-05-25T13:05:30+5:30
लातुरातील घटना : दाेन लाखांचा मुद्देमाल लंपास
लातूर : अख्खे कुटुंब घराला कुलूप लावून लग्नाला गेले अन् इकडे चाेरट्यांनी घरच साफ केले. ही घटना लातुरात बेळंबेनगर येथे २२ मे राेजी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुरुवारी चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी उमेश प्रल्हादराव लाड (वय ४३, रा. जांब, ता.जि. परभणी, ह.मु. ओम अपार्टमेंट, बेळंबेनगर, लातूर) हे कुटुंबासह त्यांच्या चुलत भावाच्या लग्नासाठी घराला कुलूप लावून २२ मे राेजी बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, चाेरट्यांनी भरदुपारी त्यांचे घर फाेडून कपाटामध्ये ठेवलेले साेन्याचे दागिने, राेख रक्कम असा एकूण एक लाख ८२ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत फिर्यादीच्या पत्नीला घर फाेडल्याचा शेजारच्याकडून फाेन आला. यावेळी त्यांनी फिर्यादीला त्यांच्या पत्नीने हा निराेप सांगितला. तातडीने त्यांनी घरी येऊन पाहिले असता, बेडरूममध्ये साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. घराचे कुलूप ताेडून चाेरट्यांनी घरात प्रवेश केला.
दरम्यान, घरातील कपाटामध्ये ठेवण्यात आलेले साेन्या- चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण एक लाख ८२ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेल्याचे दिसून आले. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.