मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी जळकोटचा युवक निघाला पायी

By हरी मोकाशे | Published: August 8, 2022 05:11 PM2022-08-08T17:11:26+5:302022-08-08T17:13:11+5:30

Latur: स्पर्धा परीक्षेच्या निकालानंतर रखडलेले नियुक्ती आदेश देण्यात यावेत तसेच नियमितपणे स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात, या मागणीसाठी येथील पदवीधर युवक रतिकांत दामोदर मुगावे हा मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत

The youth of Jalkot set out on foot to greet the Chief Minister | मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी जळकोटचा युवक निघाला पायी

मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी जळकोटचा युवक निघाला पायी

googlenewsNext

- हरी मोकाशे 
लातूर - स्पर्धा परीक्षेच्या निकालानंतर रखडलेले नियुक्ती आदेश देण्यात यावेत तसेच नियमितपणे स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात, या मागणीसाठी येथील पदवीधर युवक रतिकांत दामोदर मुगावे हा मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असून त्यासाठी तो सोमवारी मुंबईला पायी निघाला आहे. साडेपाचशे किमीचा पायी प्रवास करीत आपण निवेदन देणार असल्याचे त्याने सांगितले.

येथील रतिकांत मुगावे हा पदवीधर आहे. तो एमपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे. दरम्यान, या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना शासन सेवेत सामावून न घेतल्यामुळे आर्थिक व मानसिक धक्का बसत आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता असतानाही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रखडलेल्या नियुक्त्या द्याव्यात, स्पर्धा परीक्षा नियमित घ्याव्यात या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन देणार आहे. त्यासाठी तो जळकोट ते मुंबई असा साडेपाचशे किमीचा पायी प्रवास करणार असून साेमवारी तो प्रवासास निघाला आहे. दरम्यान, त्याचा शहरात सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

Web Title: The youth of Jalkot set out on foot to greet the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर