खोरी गल्ली येथून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:45+5:302021-07-24T04:13:45+5:30
पैसे दे म्हणून कपाळ फोडले लातूर : निलंगा तालुक्यातील चिचोंडी येथे मंदिरासमोर थांबल्यानंतर मला पैसे दे म्हणून दगडाने कपाळावर ...
पैसे दे म्हणून कपाळ फोडले
लातूर : निलंगा तालुक्यातील चिचोंडी येथे मंदिरासमोर थांबल्यानंतर मला पैसे दे म्हणून दगडाने कपाळावर मारून एकाचे कपाळ फोडून जखमी केल्याची घटना २२ रोजी घडली. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पायावर दगडाने मारून जिवे मारण्याची धमकी दिली, असे किसन पंडितराव मांडीवाड यांनी औराद शहाजानी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कृष्णा बाबूराव बिरादार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. तपसे करीत आहेत.
उदगीर येथून दुचाकीची चोरी
लातूर : उदगीर येथील एका झेरॉक्स सेंटरसमोर पार्किंग केलेल्या (एमएच २४ डब्ल्यू ६२२१) या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली. सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी आल्यानंतर झेरॉक्स दुकानासमोर गाडी लावली होती. फॉर्म भरून परत आल्यानंतर गाडी जाग्यावर नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत बाळासाहेब गोविंदराव शिंदे (रा. अतनूर, ता. जळकोट, हमु. अष्टविनायक कृष्णकांत चौक, उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
कोर्टातील साक्ष काढून घे म्हणून मारहाण
लातूर : तू कोर्टात साक्ष देऊ नको, तुझी साक्ष काढून घे, असे म्हणून शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी, काठीने मारून एकाला जखमी केल्याची घटना सेलू येथे घडली. याबाबत रामकिशन व्यंकट जाधव (रा. सेलू) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परमेश्वर चंद्रकांत कोमटवाड व अन्य तिघांविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीला पाठीवर, कमरेवर, पोटावर तसेच दोन्ही हाताच्या दंडावर मारून जखमी केले. जिवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
गंजगोलाई येथून दुचाकीची चोरी
लातूर : गंजगोलाई येथे पार्किंग केलेल्या लाल रंगाच्या (एमएच २४ एजी २१२७) या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना २२ रोजी घडली. याबाबत शेख खमराकबिन महेबुबसाब (रा. माताजीनगर, कव्हा नाका) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रस्त्यावर थांबलेल्या दुचाकीला धडक
लातूर : लातूर ते रेणापूर जाणाऱ्या रोडवर बोरवटीनजिक रस्त्यावर मोटारसायकल उभी करून थांबले असताना पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिली, असे प्रकाश विश्वनाथ राठोड (रा. नांदुर्गा तांडा, ता. औसा, हमू. कामखेडा रोड, रेणापूर) यांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार (एमएच ४४ डब्ल्यू २९१३) च्या दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फेसबुक कमेंट का केल्यास म्हणून धमकी
लातूर : फिर्यादीच्या मोबाईलवर कॉल करून तू फेसबुकवर कमेंट का केल्यास, असे म्हणून व फिर्यादी पोलीस स्टेशन येथे आला असता, तू पोलीस स्टेशनमध्ये का जातोस, असे म्हणून धमकी दिल्याची घटना अहमदपूर येथे घडली. याबाबत अनिश पाशासाब बागवान (रा. बागवान गल्ली, अहमदपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात वैभव सूर्यकांत ऊर्फ पापा पाटील (रा. गायकवाड कॉलनी, अहमदपूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.