नाना-नानी पार्क येथून दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:47+5:302020-12-23T04:16:47+5:30

प्लॉटची मोजणी करीत असताना मारहाण लातूर - फिर्यादीचे चुलते तसेच चुलत भाऊ चाकूर येथील प्लॉटची मोजणी करीत असताना दोघा-तिघांनी ...

Theft of a bike from Nana-Nani Park | नाना-नानी पार्क येथून दुचाकीची चोरी

नाना-नानी पार्क येथून दुचाकीची चोरी

googlenewsNext

प्लॉटची मोजणी करीत असताना मारहाण

लातूर - फिर्यादीचे चुलते तसेच चुलत भाऊ चाकूर येथील प्लॉटची मोजणी करीत असताना दोघा-तिघांनी येऊन हा प्लॉट आमच्या मालकीचा आहे असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत श्रमिक उत्तमराव मेटे (रा. वडवळ, ता. चाकूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागोराव पाटील (सोबत एक, दोघे, रा. चाकूर) यांच्याविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. गुंडरे करीत आहेत.

उदगीर येथून दुचाकीची चोरी

लातूर - उदगीर येथील एचडीएफसी बँकेसमोर पार्किंग केलेल्या एमएच १३ सीएल ९२०४ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत सारंग संभाजी गरड (रा.रानमसले, ता. सोलापूर, ह.मु. विकासनगर, उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोना. मडोळे करीत आहेत.

वीज चोरी उघडी पाडल्यावरून मारहाण

लातूर - वीज चोरून का वापरतोस, तुला हे शोभत नाही असे म्हटल्यावरून ‘तू माझी वीज चोरी उघडी करतोस का’ म्हणून शिवीगाळ करून काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना लिंबवाडी येथे घडली. फिर्यादीचा मुलगा सोडविण्यास आला असता त्यालाही शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, असे मनोहर सटवाजी मुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहन सटवाजी मुरकुटे यांच्याविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. लांडगे करीत आहेत.

श्रीकिशन सोमाणी विद्यालयात गणित दिन

लातूर - शहरातील श्रीकिशन सोमाणी विद्यालयात गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. चेतन सारडा, कमलकिशोर अग्रवाल, अतुल देऊळगावकर, रमाकांत स्वामी, गिरीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी शाळेत सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच गणित विभाग प्रमुख सुनीता जाधव यांनी गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांनी आभार मानले.

बांधावरील झाड तोडण्यावरून मारहाण

लातूर - सामाईक बांधावरील झाडाच्या फांद्या तोडल्याचे कारण विचारल्याने संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना निलंगा तालुक्यातील शिवणी शिवारात घडली. याबाबत नाना कृष्ण हंगरगे (रा. शिवणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सल्लाउद्दीन मजकुरी (सोबत एक, दोघेही रा. शिवणी) यांच्याविरुद्ध निलंगा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोउपनि. पठाण करीत आहेत.

बाजार समितीत २८ हजार क्विंटल सोयाबीन

लातूर - उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी २८ हजार २४५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला सर्वसाधारण ४ हजार २५० रुपयांचा दर मिळाला. यासोबतच गूळ ३४६, गहू ११९९, हायब्रीड ज्वारी ५०, रबी ज्वारी ९४, पिवळी ज्वारी २०, मका ४८, हरभरा ३३८, तूर ९५२, मूग ११५, उडीद १ हजार १११, तर करडईची ४६ क्विंटल आवक झाली असल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

रात्रीचा वीज पुरवठा, शेतकऱ्यांची गैरसोय

लातूर - जिल्ह्यात सध्या रबी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. मात्र महावितरणच्या वतीने रात्री वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना रात्री थंडीत पाणी भरावे लागत आहे. अनेक ठिकाणी तर रोहित्र नादुरुस्त झाले आहेत. मात्र याकडे महावितरणचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे दिवसा वीज पुरवठा करावा तसेच बिघाड झालेले रोहित्र तत्काळ दुरुस्त करून द्यावेत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

Web Title: Theft of a bike from Nana-Nani Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.